बीसीसीआयला आयसीसीचा दणका, पाकिस्तानबाबतच्या त्या मागणीवर दिला निर्णय

बीसीसीआयला आयसीसीचा दणका, पाकिस्तानबाबतच्या त्या मागणीवर दिला निर्णय

News18 Lokmat | Updated On: Mar 3, 2019 01:48 PM IST

बीसीसीआयला आयसीसीचा दणका, पाकिस्तानबाबतच्या त्या मागणीवर दिला निर्णय

दुबई, 3 मार्च : आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला दणका दिला आहे. आयसीसीने दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांशी संबंध ठेवू नये अशी मागणी बीसीसीआयने केली होती. ही मागणी आयसीसीने फेटाळून लावत यात त्यांची कोणतीच भूमिका नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर वर्ल्डकपमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान विरुद्ध खेळायचे की नाही यावर चर्चा होत असताना बीसीसीआयने आयसीसीला एक पत्र लिहले होते. यात आयसीसी आणि सदस्य देशांनी दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या देशांसोबत संबंध ठेवू नयेत अशी मागणी केली होती. कोणत्याही देशावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सराकरी पातळीवर घेतला जातो. अशा प्रकारचा कोणताही नियम आयसीसीमध्ये नसल्याचे आयसीसीच्या अध्यक्षांनी म्हटले आहे.

शनिवारी झालेल्या आयसीसीच्या बैठकीत दहशतवाद पसरवायला मदत करणाऱ्या देशावर बहिष्कार घालण्याचा मुद्दा चर्चेत आला. आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली नाही. बीसीसीआयचे प्रतिनिधी कार्यकारी सचिव अमिताभ चौधरींनी देशाची बाजू मांडली. भारताने आयसीसीला लिहलेल्या पत्रात पाकिस्तानचा उल्लेख करण्यात आला नव्हता.

आयसीसीचे सदस्य असलेल्या देशांमधील अनेक खेळाडू पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळतात. त्यांनी कधीही अशा बहिष्काराची मागणी केली नाही. सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा असून त्यावर चर्चा झाल्याचे एका पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

पुलवामात झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी मागणी होऊ लागली. यात सौरव गांगुलीसह हरभजन सिंग या माजी क्रिकेटपटूंनीही ही मागणी केली. बीसीसीआयने याबाबतचा निर्णय सरकारने द्यावा असं म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 3, 2019 01:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...