Home /News /sport /

खळबळजनक! इंग्लंड टीममध्ये शिरला कोरोना, पाकिस्तान सीरिजआधीच 7 जण पॉझिटिव्ह

खळबळजनक! इंग्लंड टीममध्ये शिरला कोरोना, पाकिस्तान सीरिजआधीच 7 जण पॉझिटिव्ह

पाकिस्तानविरुद्धची वनडे सीरिज सुरू व्हायच्या दोन दिवस आधीच इंग्लंडच्या (England vs Pakistan) टीममधल्या 7 जणांना कोरोनाची (Corona Virus) लागण झाली आहे.

    लंडन, 6 जुलै: पाकिस्तानविरुद्धची वनडे सीरिज सुरू व्हायच्या दोन दिवस आधीच इंग्लंडच्या (England vs Pakistan) टीममधल्या 7 जणांना कोरोनाची (Corona Virus) लागण झाली आहे. यामध्ये 3 खेळाडू आणि 4 सपोर्ट स्टाफचा समावेश आहे. इंग्लंड टीममधले इतर खेळाडू या सातही जणांच्या संपर्कात आले होते, त्यामुळे त्यांनी स्वत:ला आयसोलेट करून घेतलं आहे. इंग्लंडच्या टीममध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असला तरी पाकिस्तानविरुद्धची सीरिज वेळापत्रकानुसार होणार असल्याचं इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) सांगितलं आहे. या टीमचं नेतृत्व बेन स्टोक्स (Ben Stokes) याच्याकडे देण्यात आलं आहे. तसंच क्रिस सिल्व्हरवूड टीमचे प्रशिक्षक म्हणून परत येतील, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. ब्रिस्टलमध्ये सोमवारी खेळाडूंची पीसीआर टेस्ट करण्यात आली, यामध्ये 7 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. युके सरकारच्या नियमांनुसार हे सगळे क्वारंटाईन होतील. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे. 8 जुलैपासून या सीरिजला सुरुवात होईल. पाकिस्तानविरुद्धची सीरिज झाल्यानंतर भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळवली जाईल. ही सीरिज 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Coronavirus, Cricket, England, Pakistan

    पुढील बातम्या