जिचा जन्म झाला नव्हता तेव्हा जिंकलं होतं ग्रॅण्डस्लॅम, तिनेच सेरेनाला टेनिसचे शिकवले धडे!

जिचा जन्म झाला नव्हता तेव्हा जिंकलं होतं ग्रॅण्डस्लॅम, तिनेच सेरेनाला टेनिसचे शिकवले धडे!

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत एकेरीमध्ये 17 वर्षीय केटी आणि सेरेना विल्यम्स यांच्यात सामना झाला.

  • Share this:

वॉशिंग्टन, 30 ऑगस्ट : अमेरिकेची टेनिस स्टार सेरेना विल्यम्सची अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत दुसरी लढत अटीतटीची झाली. तिला फक्त 17 वर्षीय केटी मॅक्नेलीकडून कडवी झुंज मिलाली. मात्र सेरेनानं अनुभवाच्या जोरावर केटीवर दबाव कायम राखला आणि विजय मिळवला. दुसऱ्या फेरीतील केटीविरुद्धची लढत सेरेनानं 5-7, 6-3, 6-1 अशा फरकानं जिंकली. पहिल्या फेरीत सेरेनाचा सामना रशियन टेनिस स्टार मारिया शारापोवा हिच्याशी झाला होता. शारापोवाला सहज पराभूत करणाऱ्या सेरेनाला केटीनं झुंज दिली.

सेरेना विक्रमी 24 व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदासाठी पुन्हा मैदानात उतरली आहे. तिला पहिल्या सेटमध्ये पराभव पत्करावा लागला. केटीनं पहिला सेट 7-5 अशा फरकानं जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही तिनं सेरेनाला कडवी टक्कर दिली. त्यानंतर मात्र, सेरेनानं केटीला एकही संधी दिली नाही. तिसरा सेट सेरेनानं एकतर्फी जिंकला.

सहावेळा अमेरिकन खुल्या स्पर्धेत एकेरीचं विजेतेपद जिंकलेल्या सेरेनानं सामन्यानंतर सांगितलं की, मला चुका कमी करायला हव्यात. पहिल्या दोन सेटमध्ये खूप चुका केल्या. इतक्या चुका केल्या तर विजेतेपद पटकावता येणार नाही. मला माहिती आहे की मला अजुन चांगला करायला हवं आणि मी ते करु शकते.

सेरेनानं पहिलं ग्रँडस्लॅम 1999 मध्ये जिंकलं होतं. त्यावेळी केटी मॅक्नलेचा जन्म सुद्धा झाला नव्हता. 17 वर्षांच्या केटीनं 37 वर्षीय सेरेनाला पहिल्या सेटमध्ये पराभूत करून धक्का दिला होता. सेरेना म्हणाली की, मी कसाबसा हा सामना जिंकले, पण मी ज्या प्रकारे खेळ केला त्याचा आनंद नाही. माझ्यासाठी पुढच्या लढतीमध्ये आणखी कष्ट करून खेळण्याची गरज आहे.

SPECIAL REPORT : पुण्यात भाजपकडून कोणाला संधी? जागा 8 आणि इच्छुक उमेदवार तब्बल 130

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 30, 2019 05:44 PM IST

ताज्या बातम्या