टेनिस स्टार सेरेना विल्यम्सचं अ‍ॅलेक्सिस ओहानियनशी शुभमंगल!

टेनिस स्टार सेरेना विल्यम्सचं अ‍ॅलेक्सिस ओहानियनशी शुभमंगल!

दक्षिण अमेरिकेतील कंटेम्पररी कला केंद्र न्यू ओरलेन्स या ठिकाणी पार पडलेल्या विवाह समारंभात २५० लोकांनी हजेरी लावली होती.

  • Share this:

18 नोव्हेंबर : अमेरिकन टेनिस स्टार सेरेना विल्यम्स आणि व्यावसायिक अ‍ॅलेक्सिस ओहानियन यांचा विवाह थाटामाटात पार पडला. दक्षिण अमेरिकेतील कंटेम्पररी कला केंद्र न्यू ओरलेन्स या ठिकाणी पार पडलेल्या विवाह समारंभात २५० लोकांनी हजेरी लावली होती. यात टेलिव्हिजन स्टार किम कर्दाशियान, अभिनेत्री इवा लॉन्जोरिया, बेयॉन्स, लाला, केली रॉवलँड, कायरा या कलाकारांनी देखील हजेरी लावली होती.

सेरेना आणि अ‍ॅलेक्सिस यांनी ३० डिसेंबर २०१६ मध्ये साखरपुडा केला होता. त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच सेरेनाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. सेरेना आणि अ‍ॅलेक्सिस यांना अडीच महिन्यांची मुलगी आहे.

२३ ग्रँडस्लॅम आणि चार ऑलिम्पिक सुवर्णपदकांची मानकरी असणारी सेरेना आजवरची सर्वात प्रभावशाली महिला टेनिसपटू आहे. गर्भवती असताना देखील सेरेना जानेवारी महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळली होती. यावेळी ग्रँड स्लॅम जिंकून आणि गर्भवती असल्याची बातमी सांगून तिनं चाहत्यांचा आनंद द्विगुणीत केला होता. सेरेनाच्या घरी छोट्या परीचं आगमन झाल्यानंतर जगभरातून टेनिसप्रेमींनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला त्याप्रमाणे विवाहानंतरही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 18, 2017 10:43 AM IST

ताज्या बातम्या