मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरीज मध्ये ऋतुराजला मिळू शकते संधी, सीनियर खेळाडूंना विश्रांती

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरीज मध्ये ऋतुराजला मिळू शकते संधी, सीनियर खेळाडूंना विश्रांती

Ruturaj Gaikwad

Ruturaj Gaikwad

टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) नंतर टीम इंडिया आता न्यूझीलंडविरुद्धच्या T20 सिरीजसाठी घरच्या मैदानात उतरणार आहे.

नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर: टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) नंतर टीम इंडिया आता न्यूझीलंडविरुद्धच्या T20 (IND vs NZ) सिरीजसाठी घरच्या मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाची घोषणा कधीही केली जाऊ शकते. दरम्यान, क्रिकेट जगतात टीम इंडियाच्या 7 खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. तर यंदाच्या आयपीएल हंगामात धडाकेबाज कामगिरी करणारा ऋतुराज गायकवाड याला संघात संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

न्यूझीलंडविरुद्ध 3 टी-20 सामन्यांची सिरीज 17 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या सिरीजमधील पहिला सामना जयपूर येथे होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून टी-20 संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवले जाऊ शकते. दरम्यान, विश्रांती घेतलेल्या खेळाडूंमध्ये विराट कोहली, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा, आर. अश्विन आणि ऋषभ पंत यांची नावे समोर आली आहेत.

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला भारतीय संघातून वगळले जाऊ शकते. व्यंकटेश अय्यरला किवी संघाविरुद्ध आपली योग्यता सिद्ध करण्याची संधी दिली जाऊ शकते. या मालिकेसाठी वरुण चक्रवर्ती, राहुल चहर आणि डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल हे तीन फिरकीपटू निवडले जाण्याची शक्यता आहे.

आयपीएलच्या 2021 हंगामात ऑरेंज कॅप पुरस्कार पटकावणाऱ्या ऋतुराज गायकवाडलाही संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे, तर श्रेयस अय्यर आणि इशान किशन यालाही आपली पात्रता सिद्ध करण्याची संधी दिली जाईल.

किवी संघाविरुद्धच्या टी-20 सिरीजमध्ये प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनाही संधी मिळू शकते. तसेच, बीसीसीआय (BCCI) फलंदाजी, गोलंदाज तसेच क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांची निवड करेल.

First published:
top videos

    Tags: Rohit sharma, Team india, Virat kohli