'टीम इंडियाचा सिलेक्टर देता होता अनुष्काला चहा', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक आरोप

'टीम इंडियाचा सिलेक्टर देता होता अनुष्काला चहा', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक आरोप

माजी क्रिकेटपटूनं सांगितले निवड समिती वर्ल्ड कप दरम्यान नक्की काय काम करत होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर : भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असला तरी, टीम इंडियाची निवड समिती ही नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असते. वर्ल्ड कपमध्ये अंबाती रायडूला संघात जागा दिली नाही म्हणून निवड समितीवर चहुबाजूंनी टीका करण्यात आली होती. दरम्यान आता निवड समितीचा कार्यकाळ संपणार असून नवी समिती येऊ शकते. मात्र निवड समितीबाबत भारताच्या माजी क्रिकेटपटूनं एक धक्कादायक खुलासा केला आहे.

भारताचे माजी विकेटकीपर फारूख इंजिनिअर यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि निवड समितीवर जहरी टीका केली आहे. 81 वर्षीय फारूख यांनी, निवड समितीतील काही लोक वर्ल्ड कपमध्ये अनुष्का शर्माला चहाचा कप देण्याते काम करत होते, अशा शब्दात टिका केली आहे. एवढेच नाही तर निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर फारूख यांनी दिलीप वेंगसरकर यांनी निवड समितीच्या प्रमुखपदी यावे अशी मागणीही केली.

वाचा-क्रिकेटपटूचं मानसिक संतुलन बिघडलं, 'या' संघाला बसला मोठा धक्का

फारूख हे आपल्या वादग्रस्त व्यक्तव्यामुळं ओळखले जातात. मात्र यावेळी त्यांनी कोणत्याही खेळाडूवर नाही तर निवड समितीवर टीका केली. एमएसके प्रसाद यांच्या समितीची निवड 2016मध्ये करण्यात आली. मात्र 2019 वर्ल्ड कपमध्ये संघ निवड करताना निवड समितीनं योग्य निर्णय घेतले नाही, असे आरोप फारूख यांनी केल आहेत.

'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत फारूख यांनी, “सध्याच्या निवड समितीकडे अनुभव नाही. ही खर तर मिकी माऊसवाली टीम आहे. विराट कोहलीचे योगदान भारतासाठी महत्त्वाचे आहे पण निवड समिती योग्य आहे का? त्यांनी फक्त 10-12 कसोटी सामने खेळले आहे. एवढेच नाही तर वर्ल्ड कपमध्य निवड समितीच्या एका सदस्यानं अनुष्काला चहा देण्याचे काम केले होते”, असा खळबळजनक आरोप केला. त्यामुळं त्यांनी निवड समितीमध्ये दिलीप वेंगसरकर यांसारखे खेळाडू असावे, असे मत व्यक्त केले.

वाचा-धक्कादायक! BCCIने पैसेच दिले नाहीत, भारतीय संघ अडकला परदेशात

‘सौरव गांगुली अध्यक्ष म्हणून योग्य’

फारूख यांनी टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांची निवड बीसीसीआयच्या अध्यक्षपदी केल्यामुळं आनंद व्यक्त केला. फारूख यांनी, “गांगुली एक शानदार खेळाडू आहे. तो असा कर्णधार आहे जो नेहमी योग्य निर्णय घेतो. मला त्याच्याकडून अपेक्षा आहेत. तो नक्कीच भारतीय संघाचा चेहरामोहरा बदलेल”, असे सांगितले.

वाचा-ही तर टी-20 वर्ल्डकपच्या आधीची झलक आहे; ICCने शेअर केला Video

VIDEO: सत्तास्थापनेच्या वक्तव्यावरून खासदार संजय राऊत यांचा यू-टर्न, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 02:44 PM IST

ताज्या बातम्या