World Cup : ...म्हणून ऋषभ पंतला वर्ल्ड कप संघात स्थान नाही

World Cup : ...म्हणून ऋषभ पंतला वर्ल्ड कप संघात स्थान नाही

रिषभ पंत आणि अंबाती रायडू यांची वर्ल्ड कपमध्ये मधल्या फळीत वर्णी लागेल, अशी अपेक्षा असताना केदार जाधव आणि दिनेश कार्तिकला संघात स्थान देण्यात आले.

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल : इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. यातील दिनेश कार्तिकची लागलेली राखीव यष्टीरक्षक म्हणून वर्णी आश्चर्यकारक होती.

ऋषभ पंत आणि अंबाती रायडू यांची वर्ल्ड कपमध्ये मधल्या फळीत वर्णी लागेल, अशी अपेक्षा असताना केदार जाधव आणि दिनेश कार्तिकला संघात स्थान देण्यात आले. तर, केएल राहुल याला राखीव सलामीवीर म्हणून तर, विजय शंकर आणि रविंद्र जडेजा यांनाही संघात स्थान देण्यात आले.

दरम्यान आज झालेल्या पत्रकार परिषदेत निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांना कार्तिकच्या निवडीबाबत विचारले असता, प्रसाद यांनी, “दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्या निवडीबाबत आमची चर्चा झाली. पण दिनेश कार्तिककडं पंतच्या हिशोबानं जास्त अनुभव आहे. पण कार्तिकला संघात तेव्हाच स्थान मिळेल जेव्हा धोनी सामना खेळणार नाही. उपांत्यपूर्व फेरी किंवा अंतिम फेरीत भारत खेळेत असेल तर, अनुभव जास्त महत्वाचा. त्यामुळंच पंतला स्थान दिलं नाही’’. असं स्पष्टीकरण दिलं.21 वर्षीय पंत हा महेंद्रसिंग धोनीचा वारसदार मानला जातो. पण 2018मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पंतनं सोडलेले झेल आणि स्टम्पिंग करण्याच्या संधी यामुळं त्याला फटका बसला आहे. दरम्यान पंतला संघात स्थान न दिल्यानं अनेक माजी क्रिकेटपटू आणि दिग्गजांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

माजी क्रिकेटपटू मिशेल वॉ यानं तर, निवड समितीवर टीका केली आहे. तर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यानं रिषभ पंतला संघात स्थान मिळेल अशी असं वाटतं होतं, असं मत व्यक्त केलं.


2019 च्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, विजय शंकर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक


VIDEO : काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा, हे पाहून नवनीत राणांना कोसळलं रडू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2019 06:37 PM IST

ताज्या बातम्या