• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • पहिले T20 World Cup मध्ये खराब कामगिरी आणि आता.... विराटला 11 दिवसांमध्येच दोन मोठे धक्के

पहिले T20 World Cup मध्ये खराब कामगिरी आणि आता.... विराटला 11 दिवसांमध्येच दोन मोठे धक्के

Virat Kohli

Virat Kohli

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसाठी (Virat Kohli) मागचा संपूर्ण महिना निराशाजनक राहिला. टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवामुळे टीम इंडियाचं (Team India) सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्न भंगलं. यानंतर आता विराटला आणखी दोन धक्के बसले आहेत.

 • Share this:
  मुंबई, 19 सप्टेंबर : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसाठी (Virat Kohli) मागचा संपूर्ण महिना निराशाजनक राहिला. टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवामुळे टीम इंडियाचं (Team India) सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्न भंगलं. सुपर-12 स्टेजलाच विराट कोहलीच्या टीमचं आव्हान संपुष्टात आलं. टी-20 वर्ल्ड कपनंतर आपण या फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडणार असल्याचं विराटने स्पर्धा सुरू व्हायच्या आधीच जाहीर केलं होतं, यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-20 मॅचच्या सीरिजपासून रोहित शर्माकडे (Rohit Sharma) भारतीय टीमचं नेतृत्व देण्यात आलं. टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा अखेरचा सामना 8 नोव्हेंबरला खेळवला गेला. या मॅचमध्ये टीम इंडियाने 9 विकेटने दणदणीत विजय मिळवला. विराट कोहली आणि रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या जोडीसाठी हा सामना अखेरचा होता. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक असणाऱ्या रवी शास्त्री यांनीही आपला कार्यकाळ संपल्यानंतर या पदावर न राहण्याचा निर्णय घेतला. विराट आणि शास्त्री यांच्या जोडीने टीमला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले. 4 वर्षांच्या कार्यकाळात भारताने ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियात दोनदा टेस्ट सीरिजमध्ये पराभव केला, तर इंग्लंडमध्येही टेस्ट सीरिजमध्ये आघाडी घेतली. या दोघांच्या जोडीला भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकवून देण्यात अपयश आलं. रवी शास्त्रींनी टीम इंडियाची साथ सोडल्यानंतर राहुल द्रविड (Rahul Dravid) टीमचा मुख्य प्रशिक्षक झाला. रवी शास्त्रींनी साथ सोडल्याच्या पहिल्या धक्क्यातून सावरण्याच्या आतच आता विराट कोहलीला आणखी एक धक्का बसला आहे. विराट कोहलीचा मित्र आणि आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळणाऱ्या एबी डिव्हिलियर्सनेही (Ab De Villiers) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मागच्या 11 दिवसात पहिले रवी शास्त्री आणि मग एबी डिव्हिलियर्स सोडून जाणं विराटसाठी मोठे धक्के आहेत. डिव्हिलियर्सच्या निवृत्तीवर जिवलग मित्र विराटची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला... आयपीएल 2022 (IPL 2022 Auction) चा लिलाव पुढच्या एक ते दोन महिन्यांमध्ये होणार आहे. लिलावामध्ये आरसीबीसाठी एबी डिव्हिलियर्ससारखा महान खेळाडू मिळणं, अशक्यच आहे. दुसरीकडे विराट कोहलीने टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडल्यामुळे आरसीबीला नवा कर्णधारही शोधावा लागणार आहे. 'मी अर्धा भारतीय...' डिव्हिलियर्सच्या 'या' एका गोष्टीने सर्व भारतीयांची मनं जिंकली
  Published by:Shreyas
  First published: