दिल्ली, 22 नोव्हेंबर : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये (Sayed Mushtaq Ali Trophy Final) तामिळनाडूने कर्नाटकवर (Tamil Nadu vs Karnataka) रोमांचक विजय मिळवला आहे. शेवटच्या बॉलला 5 रनची गरज असताना शाहरुख खानने (Shahrukh Khan) सिक्स मारत तामिळनाडूला लागोपाठ दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकवून दिली. कर्नाटकने दिलेल्या 152 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना तामिळनाडूला अखेरच्या ओव्हरमध्ये विजयसाठी 16 रनची गरज होती, पण प्रतीक जैनने या ओव्हरमध्ये दोन वाईड बॉल टाकले, तसंच साई किशोरने एक फोर आणि शाहरुखने दोन सिक्स मारत मॅच तामिळनाडूच्या दिशेने फिरवली.
WHAT. A. FINISH! 👌 👌 A last-ball SIX from @shahrukh_35 does the trick! 💪 💪 Tamil Nadu hold their nerve & beat the spirited Karnataka side by 4 wickets to seal the title-clinching victory. 👏 👏 #TNvKAR #SyedMushtaqAliT20 #Final Scorecard ▶️ https://t.co/RfCtkN0bjq pic.twitter.com/G2agPC795B
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 22, 2021
शाहरुख खान 15 बॉलमध्ये 33 रनवर नाबाद राहिला, त्याच्या या खेळीमध्ये 1 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. जगदीशनने 41 रनची तर हरी निशांतने 23 रनची खेळी केली. तामिळनाडूचा कर्णधार विजय शंकर 18 रन करून आऊट झाला. कर्नाटककडून केसी करियप्पला सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या, तर प्रतीक जैन, विद्याधर पाटील आणि करुण नायर यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये तामिळनाडूचा कर्णधार विजय शंकरने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर तामिळनाडूने कर्नाटकला 20 ओव्हरमध्ये 151 रनवर रोखलं. कर्नाटककडून अभिनव मनोहरने सर्वाधिक 46 रन केले, तर प्रविण दुबे 33 रन करून आऊट झाला. जगदिशा सुचितने 7 बॉलमध्ये 18 रन करून कर्नाटकला 151 रनपर्यंत पोहोचवलं. तामिळनाडूकडून साई किशोरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर वारियर, यादव आणि नटराजन यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.