नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये (Sayed Mushtaq Ali Trophy Final) तामिळनाडूने कर्नाटकवर (Tamil Nadu vs Karnataka) रोमांचक विजय मिळवला. शेवटच्या बॉलवर 5 रनची आवश्यकता असताना तामिळनाडूच्या शाहरुख खानने (Shahrukh Khan) थरारक विजय मिळवून दिला. अखेरच्या ओव्हरमध्ये तामिळनाडूला जिंकण्यासाठी 16 रन हव्या होत्या, तेव्हा शाहरुखने तणावाच्या परिस्थितीमध्येही डोकं शांत ठेवत मॅच संपवली. शाहरुख खानने 15 बॉलमध्ये नाबाद 33 रन केले, यामध्ये एक फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. साई किशोर 6 रनवर नाबाद राहिला. तामिळनाडूचा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी फायनलमधला हा सलग दुसरा विजय आहे, याआधी 2020 सालीही तामिळनाडूच चॅम्पियन झाली होती. तर 2019 साली कर्नाटकने फायनलमध्ये तामिळनाडूचा एक रनने पराभव केला होता.
लागोपाठ दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकल्याबद्दल आयपीएलची टीम चेन्नई सुपर किंग्सने (CSK) तामिळनाडूचं अभिनंदन केलं. हे करताना सीएसकेने एमएस धोनीचा (MS Dhoni) हा सामना बघतानाचा फोटो शेयर केला. या फोटोमध्ये धोनी शाहरुख खानने मारलेली शेवटची सिक्स बघत आहे. सीएसकेने हा फोटो शेयर करताच चाहत्यांनी लगेचच चेन्नई सुपर किंग्सला धोनीसारखाच नवा फिनिशर मिळाल्याच्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. आयपीएल 2022 चा लिलाव येत्या काही महिन्यांमध्ये होणार आहे, या लिलावात शाहरुख खानवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. शाहरुख खान आयपीएल 2021 मध्ये पंजाब किंग्सकडून खेळला. पंजाबने शाहरुखला लिलावात 5.25 कोटी रुपये देऊन विकत घेतलं होतं.
Fini ing off in sty7e! #SyedMushtaqAliTrophy #WhistlePodu pic.twitter.com/QeuLPrJ9Mh
— Chennai Super Kings - Mask Pdu Whistle Pdu! (@ChennaiIPL) November 22, 2021
शाहरुख मैदानात उतरला तेव्हा तामिळनाडूला विजयासाठी 28 बॉलमध्ये 57 रनची गरज होती. शाहरुखने या 57 रनपैकी 33 रन करून टीमचा विजय निश्चित केला. तामिळनाडूचा ओपनर नारायण जगदीशनने 46 रनची महत्त्वाची खेळी केली, तर कर्णधार विजय शंकर 18 रन करून आऊट झाला.
SRK to CSK
— Achhu (@Achhyuthaa) November 22, 2021
IPL auction preparation
— Vinoth R Raja (@VinothRRaja) November 22, 2021
Next auction aa rha na wo confirm?
— (@AdiiCricted7) November 22, 2021
Is Dhoni watching CSK next finisher??
— MAHIYANK ™ (@Mahiyank_78) November 22, 2021
कर्नाटकच्या बॉलर्सनी मॅचच्या 17 ओव्हर चांगली बॉलिंग केली. शेवटच्या 3 ओव्हरमध्ये तामिळनाडूला विजयासाठी 36 रनची आवश्यकता होती. 18 वी ओव्हर डावखुरा फास्ट बॉलर प्रतीक जैनने टाकली, यात त्याने फक्त 6 रन देऊन एक विकेट मिळवली. यानंतर अखेरच्या 2 ओव्हरमध्ये तामिळनाडूला 30 रन हव्या होत्या, तेव्हा 19 व्या ओव्हरमध्ये 14 रन आले. शाहरुखने या ओव्हरच्या अखेरच्या बॉलला सिक्स मारला, याशिवाय 4 रन बाय मिळाल्या.
तामिळनाडूने रेकॉर्ड तिसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. टीमचा हा लागोपाठ दुसरा किताब आहे. याआधी 2006-07 मध्येही तामिळनाडू चॅम्पियन झाली होती. कर्नाटक, गुजरात आणि बडोदा यांना प्रत्येकी 2-2 वेळा ट्रॉफी जिंकता आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.