Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

भारतीय बॉलरचं World Record, T20 च्या 4 ओव्हरमध्ये दिली नाही एकही रन

भारतीय बॉलरचं World Record, T20 च्या 4 ओव्हरमध्ये दिली नाही एकही रन

अक्षय कर्नेवारने (Akshay Karnewar) टी-20 क्रिकेटमध्ये (T20 Cricket) नवा विश्वविक्रम केला आहे. अक्षय टी-20 इतिहासात 4 ओव्हरमध्ये एकही रन न देणारा जगातला पहिला बॉलर बनला आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 8 नोव्हेंबर : अक्षय कर्नेवारने (Akshay Karnewar) टी-20 क्रिकेटमध्ये (T20 Cricket) नवा विश्वविक्रम केला आहे. अक्षय टी-20 इतिहासात 4 ओव्हरमध्ये एकही रन न देणारा जगातला पहिला बॉलर बनला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या (Sayed Mushtaq Ali Trophy) सामन्यात डावखुरा स्पिनर अक्षयने विदर्भाकडून खेळताना मणीपूरविरुद्धच्या (Vidarbha vs Manipur) मॅचमध्ये हा विक्रम केला. अक्षयने त्याच्या 4 ओव्हरमध्ये एकही रन दिल्या नाहीत, म्हणजेच त्याच्या चारही ओव्हर मेडन होत्या. याचसह त्याने 2 विकेटही घेतल्या. विदर्भाने हा सामना तब्बल 167 रनच्या अंतराने जिंकला. याआधी गौरव गंभीरने 3 ओव्हरमध्ये एकही रन न देता 3 विकेट घेतल्या होत्या.

विदर्भाने पहिले बॅटिंग करत 4 विकेट गमावून 222 रन केले. जितेश शर्माने नाबाद 71 रन केले. 31 बॉलमध्ये केलेल्या या खेळीत 5 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता. या आव्हानाचा पाठलाग करताना मणीपूर 16.3 ओव्हरमध्ये 55 रनमध्ये ऑल आऊट झाली. मणीपूरच्या 9 खेळाडूंना दोन आकडी धावसंख्याही बनवता आली नाही.

मुंबईला पराभवाचा धक्का

दुसरीकडे तगड्या मुंबईला छत्तीसगडने (Mumbai vs Chhattisgarh) पराभवाचा धक्का दिला आहे. गुवाहाटीच्या नेहरू स्टेडियममध्ये झालेल्या या अत्यंत रोमांचक सामन्यात मुंबईचा फक्त एक रनने पराभव झाला. छत्तीसगडने दिलेल्या 158 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 156 रन करता आल्या. कर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) 55 बॉलमध्ये नाबाद 69 रन केले. तर सिद्धेश लाडने (Siddhesh Lad) 35 बॉलमध्ये 46 रनची खेळी केली. ऑलराऊंडर शिवम दुबे (Shivam Dube) 11 बॉलमध्ये 22 रन करून आऊट झाला. आयपीएलमध्ये धमाकेदार बॅटिंग करणारा पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) या सामन्यात शून्य रनवर पॅव्हेलियनमध्ये परतला. छत्तीसगडच्या सुमित रुईकर आणि रवी किरण यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. सौरभ मुजुमदारला एक विकेट घेण्यात यश आलं.

या सामन्यात छत्तीसगडने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 157 रन केले. ओपनर अखील हेरवाडकरने 53 रन केले तर शशांक सिंगने 28 बॉलमध्ये 57 रनची खेळी केली. मुंबईकडून सिद्धेश लाड, मोहित अवस्थी, तुषार देशपांडे आणि अथर्व अंकोलेकर यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

First published:

Tags: T20 cricket