मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL गाजवल्यानंतर Mushtaq Ali Trophy मध्येही धमाका, हा खेळाडू घेणार हार्दिकची जागा!

IPL गाजवल्यानंतर Mushtaq Ali Trophy मध्येही धमाका, हा खेळाडू घेणार हार्दिकची जागा!

आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) फायनलपर्यंत पोहोचवल्यानंतर व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही (Sayed Mushtaq Ali Trophy) धमाकेदार कामगिरी केली आहे.

आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) फायनलपर्यंत पोहोचवल्यानंतर व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही (Sayed Mushtaq Ali Trophy) धमाकेदार कामगिरी केली आहे.

आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) फायनलपर्यंत पोहोचवल्यानंतर व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही (Sayed Mushtaq Ali Trophy) धमाकेदार कामगिरी केली आहे.

मुंबई, 9 नोव्हेंबर : आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) फायनलपर्यंत पोहोचवल्यानंतर व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही (Sayed Mushtaq Ali Trophy) धमाकेदार कामगिरी केली आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत बिहारविरुद्धच्या (Madhya Pradesh vs Bihar) सामन्यात अय्यरने ऑलराऊंड कामगिरी केली. पहिले बॉलिंग करत अय्यरने 4 ओव्हरमध्ये फक्त 2 रन देऊन 2 विकेट मिळवल्या, यानंतर त्याने 20 बॉलमध्ये नाबाद 36 रन केले. अय्यरने आपल्या या खेळीमध्ये 7 फोर मारले. या सामन्यात बिहारची टीम फक्त 59 रनवर ऑल आऊट झाली. हे आव्हान मध्य प्रदेशने 34 बॉलमध्ये 1 विकेट गमावून पार केलं.

दिल्लीत झालेल्या या सामन्यात बिहारने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण दुसऱ्याच ओव्हरमध्ये कुलदीप सेनने बिहारला पहिला धक्का दिला. मंगल महरोर फक्त 4 रन करून आऊट झाला. यानंतर बिहारची बॅटिंग गडगडली. एका बाजूने आयपीएल 2021 मध्ये शानदार बॉलिंग करणारा दिल्ली कॅपिटल्सचा आवेश खान (Avesh Khan) आणि दुसऱ्या बाजूने व्यंकटेश अय्यर यांनी बिहारच्या बॅटरना त्रास दिला.

अय्यरने यशस्वी ऋषवला एक रनवर आणि शेखर कुमार सिंगला शून्य रनवर आऊट केलं. यानंतर आवेश खान आणि मिहिर हिरवानी यांनी बिहारला एकामागोमाग धक्के दिले, ज्यामुळे बिहारचा 18 ओव्हरमध्ये 59 रनवर ऑल आऊट केलं. बिहारच्या फक्त तीन खेळाडूंना दोन आकडी रन करता आले.

अय्यरने टाकले 22 डॉट बॉल

व्यंकटेश अय्यरने 4 ओव्हरमध्ये 22 बॉल डॉट टाकले, उरलेल्या दोन बॉलमध्ये त्याने फक्त दोन रन दिले आणि दोन विकेटही पटकावल्या. यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना व्यंकटेश अय्यरने फटकेबाजी केली. कुलदीप गेहीसोबत त्याने 30 बॉलमध्ये 48 रनची पार्टनरशीप केली. कुलदीप 14 बॉलमध्ये 21 रन करून आऊट झाला. अय्यरने 20 बॉलमध्ये 7 फोरच्या मदतीने नाबाद 36 रनची खेळी केली.

अय्यरचा न्यूझीलंड सीरिजसाठी दावा मजबूत

व्यंकटेश अय्यरने न्यूझीलंड सीरिजसाठी आपला दावा आणखी मजबूत केला आहे. 17 नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या टी-20 सीरिजला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) फिटनेसमुळे त्रस्त आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्येही (T20 World Cup) पांड्याची कामगिरी निराशाजनक झाली, त्यामुळे व्यंकटेश अय्यर हार्दिक पांड्याची जागा घेऊ शकतो. अय्यरने आयपीएल 2021 मध्ये केकेआरकडून खेळताना 10 मॅचमध्ये 370 रन केले आणि 3 विकेट मिळवल्या होत्या.

आवेश खाननेही घेतल्या 3 विकेट

व्यंकटेश अय्यरशिवाय आवेश खाननेही या सामन्यात चांगली बॉलिंग केली. 3 ओव्हरमध्ये 6 रन देऊन त्याने 3 विकेट घेतल्या. आवेशने आयपीएल 2021 मध्येही उत्कृष्ट कामगिरी केली. 16 मॅचमध्ये त्याला 24 विकेट मिळाल्या होत्या. आवेश खानची न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजसाठीही निवड होऊ शकते.

First published:
top videos

    Tags: Hardik pandya, New zealand, Team india