मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /5 कोटींच्या खेळाडूचा धमाका, 38 दिवसांमध्ये पिवळ्या जर्सीला तिसरी ट्रॉफी!

5 कोटींच्या खेळाडूचा धमाका, 38 दिवसांमध्ये पिवळ्या जर्सीला तिसरी ट्रॉफी!

शाहरुख खानने (Shahrukh Khan) तामिळनाडूला तिसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीचं (Sayed Mushtaq Ali Trophy) चॅम्पियन बनवलं आहे. सोमवारी कर्नाटकविरुद्ध झालेल्या रोमांचक फायनलमध्ये तामिळनाडूचा (Tamil Nadu vs Karnataka) 4 विकेटने विजय झाला.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : शाहरुख खानने (Shahrukh Khan) तामिळनाडूला तिसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीचं (Sayed Mushtaq Ali Trophy) चॅम्पियन बनवलं आहे. सोमवारी कर्नाटकविरुद्ध झालेल्या रोमांचक फायनलमध्ये तामिळनाडूचा (Tamil Nadu vs Karnataka) 4 विकेटने विजय झाला. शेवटच्या बॉलवर तामिळनाडूला विजयासाठी 5 रनची गरज होती, तेव्हा शाहरुख खानने सिक्स मारून थरारक विजय मिळवून दिला. शाहरुख आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये पंजाब किंग्सकडून (Punjab Kings) खेळला. पंजाब किंग्सने शाहरुखला 5.25 कोटी रुपयांना विकत घेतलं. तामिळनाडूची टीम या स्पर्धेत पिवळ्या जर्सीमध्ये खेळत होती. याआधी 15 ऑक्टोबरला एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आयपीएल ट्रॉफी जिंकली, यानंतर 14 नोव्हेंबरला टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये (T20 World Cup Final) ऑस्ट्रेलियाचा (Australia) विजय झाला. या दोन्ही टीमच्या जर्सीचा रंगही पिवळाच होता, म्हणजेच मागच्या 38 दिवसांमध्ये पिवळ्या रंगाच्या जर्सीला तीन टी-20 ट्रॉफी मिळाल्या आहेत.

शाहरुख खानने 15 बॉलमध्ये नाबाद 33 रन केले, यामध्ये एक फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. शाहरुख मैदानात उतरला तेव्हा तामिळनाडूला विजयासाठी 28 बॉलमध्ये 57 रनची गरज होती. शाहरुखने या 57 रनपैकी 33 रन करून टीमचा विजय निश्चित केला. तामिळनाडूचा ओपनर नारायण जगदीशनने 46 रनची महत्त्वाची खेळी केली, तर कर्णधार विजय शंकर 18 रन करून आऊट झाला.

कर्नाटकच्या बॉलर्सनी मॅचच्या 17 ओव्हर चांगली बॉलिंग केली. शेवटच्या 3 ओव्हरमध्ये तामिळनाडूला विजयासाठी 36 रनची आवश्यकता होती. 18 वी ओव्हर डावखुरा फास्ट बॉलर प्रतीक जैनने टाकली, यात त्याने फक्त 6 रन देऊन एक विकेट मिळवली. यानंतर अखेरच्या 2 ओव्हरमध्ये तामिळनाडूला 30 रन हव्या होत्या, तेव्हा 19 व्या ओव्हरमध्ये 14 रन आले. शाहरुखने या ओव्हरच्या अखेरच्या बॉलला सिक्स मारला, याशिवाय 4 रन बाय मिळाल्या.

तामिळनाडूला अखेरच्या ओव्हरमध्ये 16 रन पाहिजे होते. 20 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर साई किशोरने फोर मारली, यानंतर शाहरुखने अखेरच्या बॉलवर सिक्स मारून तामिळनाडूला चॅम्पियन बनवलं. या सामन्यात कर्नाटकने पहिले बॅटिंग करत 7 विकेट गमावून 151 रन केले.

तामिळनाडूने रेकॉर्ड तिसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. टीमचा हा लागोपाठ दुसरा किताब आहे. याआधी 2006-07 मध्येही तामिळनाडू चॅम्पियन झाली होती. कर्नाटक, गुजरात आणि बडोदा यांना प्रत्येकी 2-2 वेळा ट्रॉफी जिंकता आली आहे. या विजयानंतर आर.अश्विनने शाहरुख खानची तुलना मार्टिन गप्टीलशी केली.

First published:
top videos