मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL चे स्टार Mushtaq Ali Trophy मध्ये फेल! मुंबईचा सगळ्यात धक्कादायक पराभव

IPL चे स्टार Mushtaq Ali Trophy मध्ये फेल! मुंबईचा सगळ्यात धक्कादायक पराभव

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy) मुंबईच्या (Mumbai) टीमला पराभवाचा सगळ्यात मोठा धक्का बसला आहे. नवख्या छत्तीसगडच्या (Chattisgarh vs Mumbai) टीमने कागदावरच्या दिग्गज मुंबईला पराभवाची धूळ चारली आहे.

  • Published by:  Shreyas

गुवाहाटी, 8 नोव्हेंबर : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy) मुंबईच्या (Mumbai) टीमला पराभवाचा सगळ्यात मोठा धक्का बसला आहे. नवख्या छत्तीसगडच्या (Chattisgarh vs Mumbai) टीमने कागदावरच्या दिग्गज मुंबईला पराभवाची धूळ चारली आहे. गुवाहाटीच्या नेहरू स्टेडियममध्ये झालेल्या या अत्यंत रोमांचक सामन्यात मुंबईचा फक्त एक रनने पराभव झाला. छत्तीसगडने दिलेल्या 158 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 156 रन करता आल्या. कर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) 55 बॉलमध्ये नाबाद 69 रन केले. तर सिद्धेश लाडने (Siddhesh Lad) 35 बॉलमध्ये 46 रनची खेळी केली. ऑलराऊंडर शिवम दुबे (Shivam Dube) 11 बॉलमध्ये 22 रन करून आऊट झाला. आयपीएलमध्ये धमाकेदार बॅटिंग करणारा पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) या सामन्यात शून्य रनवर पॅव्हेलियनमध्ये परतला. छत्तीसगडच्या सुमित रुईकर आणि रवी किरण यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. सौरभ मुजुमदारला एक विकेट घेण्यात यश आलं.

या सामन्यात छत्तीसगडने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 157 रन केले. ओपनर अखील हेरवाडकरने 53 रन केले तर शशांक सिंगने 28 बॉलमध्ये 57 रनची खेळी केली. मुंबईकडून सिद्धेश लाड, मोहित अवस्थी, तुषार देशपांडे आणि अथर्व अंकोलेकर यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी निराशाजनक झाली, त्यामुळे येत्या काळात टीममध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. पुढचा टी-20 वर्ल्ड कप लगेच 11 महिन्यांनी ऑस्ट्रेलियात होणार आहे. तसंच जानेवारी महिन्यात आयपीएलचा मेगा ऑक्शन (IPL Auction 2022) आहे. त्यामुळे यंदाची सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा महत्त्वाची मानली जात आहे. टीम इंडियाची निवड समिती आणि आयपीएल टीमचं या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंकडे लक्ष आहे. मुंबईच्या खेळाडूंना मात्र चमक दाखवण्यात अपयश आलं आहे.

First published:

Tags: Mumbai, T20 cricket