मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Sayed Mushtaq Ali Trophy : रोहित कॅप्टन व्हायच्या आधी शॉचा धमाका, वाढदिवशीच फोडले फटाके

Sayed Mushtaq Ali Trophy : रोहित कॅप्टन व्हायच्या आधी शॉचा धमाका, वाढदिवशीच फोडले फटाके

मुंबईचा ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने वाढदिवशीच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Sayed Mushtaq Ali Trophy) धमाका केला आहे, ज्यामुळे मुंबईने बडोद्यावर (Mumbai vs Baroda) मोठा विजय मिळवला आहे.

मुंबईचा ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने वाढदिवशीच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Sayed Mushtaq Ali Trophy) धमाका केला आहे, ज्यामुळे मुंबईने बडोद्यावर (Mumbai vs Baroda) मोठा विजय मिळवला आहे.

मुंबईचा ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने वाढदिवशीच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Sayed Mushtaq Ali Trophy) धमाका केला आहे, ज्यामुळे मुंबईने बडोद्यावर (Mumbai vs Baroda) मोठा विजय मिळवला आहे.

  • Published by:  Shreyas

गुवाहाटी, 9 नोव्हेंबर : मुंबईचा ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने वाढदिवशीच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Sayed Mushtaq Ali Trophy) धमाका केला आहे, ज्यामुळे मुंबईने बडोद्यावर मोठा विजय मिळवला आहे. पृथ्वी शॉने 63 बॉलमध्ये 83 रन केले, यात 4 सिक्स आणि 6 फोरचा समावेश होता. याचसह मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) स्पर्धेतल्या पाचव्या सामन्यातलं चौथं अर्धशतक केलं. रहाणने 45 बॉलमध्ये 71 रनची खेळी केली, यात 8 फोर आणि 2 सिक्स होत्या. मुंबईच्या ओपनरने केलेल्या या आक्रमक बॅटिंगमुळे मुंबईने बडोद्यावर 82 रनने विजय मिळवला.

एलिट ग्रुप बीमध्ये असलेल्या मुंबईचा बडोद्याविरुद्ध विजय झाला असला तरी त्यांना क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळाला नाही. मुंबईने ग्रुपमधले 5 पैकी तीन सामने जिंकले, पण त्यांचा छत्तीसगड आणि कर्नाटकविरुद्ध पराभव झाला. क्वार्टर फायनलला पोहोचण्यासाठी मुंबईला बडोद्याचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागणार होता, तसंच कर्नाटकने बंगालचा पराभव करणं गरजेचं होतं. मुंबईने बडोद्याचा मोठ्या फरकाने पराभव करत क्वार्टर फायनलला पोहोचण्याच्या आशा कायम ठेवल्या, पण बंगालने कर्नाटकला धूळ चारत मुंबईला धक्का दिला.

या सामन्यात बडोद्याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर आपला 22 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या शॉने अजिंक्य रहाणेच्या मदतीने पहिल्या विकेटसाठी 100 बॉलमध्येच 151 रनची पार्टनरशीप केली. रहाणे सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. 5 सामन्यांमध्ये तयाने 57.20 च्या सरासरीने आणि 133.64 च्या स्ट्राईक रेटने 286 रन केले. रहाणे स्पर्धेतला सर्वाधिक रन करणारा खेळाडूही आहे. लीग स्टेजमध्ये त्याने 71, 75, 54, 17 आणि 69 रनची खेळी केल्या आहेत.

न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी अजिंक्य रहाणेसाठी हा फॉर्म दिलासादायक असेल. इंग्लंड दौऱ्यात रहाणेची कामगिरी निराशाजनक झाली. 4 सामन्यांमध्ये 15.57 च्या सरासरीने रहाणेला फक्त 109 रन करता आले. यानंतर रहाणेचं टेस्ट टीममधलं स्थान धोक्यात आलं.

पृथ्वी शॉलाही संधी

दुसरीकडे पृथ्वी शॉच्या या आक्रमक बॅटिंगमुळे त्याचीही न्यूझीलंडविरुद्धच्या (India vs New Zealand) टी-20 सीरिजसाठी टीममध्ये निवड होऊ शकते. टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली आहे, तसंच खेळाडू बराच काळ बायो-बबलमध्ये क्रिकेट खेळत आहेत, त्यामुळे काही खेळाडूंची टीममधून गच्छंती होईल, तर काहींना विश्रांती दिली जाईल, त्यामुळे टीम इंडियात पृथ्वी शॉचं पुनरागमन व्हायची शक्यता आहे.

पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणेच्या दीड शतकी पार्टनरशीपसह शिवम दुबेने 9 बॉलमध्ये नाबाद 23 रन केले, ज्यामुळे मुंबईने बडोद्याला विजयासाठी 194 रनचं आव्हान दिलं. मुंबईच्या या आव्हानाचा पाठलाग करताना बडोद्याला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 111 रन करता आले. तनुष कोटियनने 4 ओव्हरमध्ये 16 रन देऊन 4 विकेट घेतल्या. तर मोहित अवस्थीला 2 आणि अर्थव अंकोलेकर, सिद्धेश लाड आणि प्रशांत सोळंकी यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

First published:

Tags: Prithvi Shaw