• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Syed Mushtaq Ali Trophy आधी मुंबई अडचणीत, 4 खेळाडूंना कोरोनाची लागण

Syed Mushtaq Ali Trophy आधी मुंबई अडचणीत, 4 खेळाडूंना कोरोनाची लागण

सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी Syed Mushtaq Ali Trophy)आधी मुंबईची टीम (Mumbai Team) अडचणीत आली आहे, कारण मुंबईच्या चार खेळाडूंची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह (Covid-19) आली आहे.

 • Share this:
  मुंबई, 27 ऑक्टोबर : सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी Syed Mushtaq Ali Trophy)आधी मुंबईची टीम (Mumbai Team) अडचणीत आली आहे, कारण मुंबईच्या चार खेळाडूंची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह (Covid-19) आली आहे. त्यामुळे या खेळाडूंना स्पर्धेतून आपलं नाव मागे घ्यावं लागलं आहे. मुंबई विमानतळावर सरफराज खान (Sarfaraz Khan), प्रशांत सोळंकी (Prashant Solanki), शम्स मुलानी (Shams Mulani) आणि साईराज पाटील (Sairaj Patil) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. यानंतर चौघांना घरी पाठवण्यात आलं आणि क्वारंटाईन करण्यात आलं आहे. या चौघांऐवजी दुसऱ्या खेळाडूंना लवकरच टीममध्ये स्थान दिलं जाईल, असं मुंबई क्रिकेट असोसिएशनने स्पष्ट केलं आहे. अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वात मुंबईची टीम बुधवारी गुवाहाटीसाठी रवाना होत होती, तेव्हा हे चार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले. 4 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत मुंबईची टीम ग्रुप बीमध्ये आहे. मुंबई लीग स्टेजच्या सगळ्या मॅच गुवाहाटीमध्येच खेळणार आहे. मुंबई एलीट बी ग्रुपमध्ये कर्नाटक, बंगाल, बडोदा, छत्तीसगड आणि सर्व्हिसेसविरुद्ध खेळणार आहे. 'आम्ही चार खेळाडूंची आरटी-पीसीआर टेस्ट करत आहोत, त्याचे रिपोर्ट लवकरच येतील, यानंतरचे ते टीमशी जोडले जातील. आम्ही टीमच्या इतर खेळाडूंचीही कोरोना टेस्ट करत आहोत,' असं एमसीएच्या सूत्रांनी सांगितलं. चार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे एमसीएबाबत आणि बायो बबलच्या नियमांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. खेळाडूंना शहरातल्या कमांडो ट्रेनिंग सेंटरमध्या का नेण्यात आलं, असा प्रश्न निर्माण होत आहे. गुवाहाटीला निघण्याच्या एक दिवस आधी मंगळवारी मुंबईच्या टीमचे खेळाडू वानखेडे स्टेडियममध्ये सराव करत होते. एक दिवस आधी खेळाडूंची कोरोना टेस्ट करण्यात आली. टेस्ट पॉझिटिव्ह आली तर खेळाडूंनी विमानतळावर जाऊ नये, असं त्यांना सांगण्यात आलं, पण तरीही खेळाडू विमानतळावर गेले. आता त्यांना विमानतळावरून परत पाठवण्यात आलं. नव्या खेळाडूंची निवड करण्याबाबत निवड समितीला सांगण्यात आलं आहे, असं एमसीएच्या अधिकाऱ्याने सांगितलं. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेचे सामने 4 नोव्हेंबरपासून गुवाहाटी, लखनऊ, बडोदा, दिल्ली, विजयवाडा आणि हरियाणामध्ये खेळवण्यात येणार आहेत. खेळाडूंना 5 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे, त्याआधी खेळाडूंना 7 दिवस आधी स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचावं लागणार आहे.
  Published by:Shreyas
  First published: