मुंबई, 27 डिसेंबर : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) साठी मुंबईचं नेतृत्व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्याकडे देण्यात आलं आहे. मुंबईने शनिवारी वेबसाईटवरून टीमची घोषणा केली. सूर्यकुमार यादवशिवाय आदित्य तरे, यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, सिद्धेश लाड आणि शिवम दुबे यांचीही निवड झाली आहे. तर फास्ट बॉलिंगची जबाबदारी धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे यांच्याकडे असेल. स्पिनर म्हणून अथर्व अंकोलेकर आणि शम्स मुलानी आहेत.
खेळाडूंना 29 डिसेंबरला वानखेडे स्टेडियममध्ये पोहोचण्याआधी खेळाडूंना कोरोनाची आरटी-पीसीआर टेस्टचे निगेटिव्ह रिपोर्ट देणं गरजेचं आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीपासून भारताच्या स्थानिक क्रिकेटच्या मोसमाची सुरूवात होणार आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेआधी मुंबईने घेतलेल्या सराव सामन्यात सूर्यकुमार यादव आणि तुषार देशपांडे चमकले. सूर्यकुमार यादवने 240 रन केले, ज्यामध्ये एका शतकाचा समावेश आहे. तर तुषार देशपांडेने 9 विकेट घेतल्या. याशिवाय यशस्वी जयस्वालने 164 रन आणि शिवम दुबेने 114 रन केले.
मुंबईची टीम
सूर्यकुमार यादव (कर्णधार), आदित्य तरे, यशस्वी जयसवाल, आकर्षित गोमेल, सरफराज खान, सिद्धेश लाड, शिवम दुबे, शुभम रांजणे, सुजीत नायक, साईराज पाटील, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी, मिनाद मांजरेकर, प्रथमेश डाके, अथर्व अंकोलेकर, शशांक अत्तारदे, शम्स मुलानी, हार्दिक तामोर, आकाश पारकर आणि सूफियान शेख