मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Syed Mushtaq Ali Trophy: हा खेळाडू झाला महाराष्ट्राचा कर्णधार

Syed Mushtaq Ali Trophy: हा खेळाडू झाला महाराष्ट्राचा कर्णधार

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Sayed Mushtaq Ali Trophy) साठी महाराष्ट्राच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. आक्रमक बॅट्समन राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) याची महाराष्ट्राच्या कर्णधारपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

    मुंबई, 31 डिसेंबर : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Sayed Mushtaq Ali Trophy) साठी महाराष्ट्राच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. आक्रमक बॅट्समन राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) याची महाराष्ट्राच्या कर्णधारपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 10 जानेवारीपासून या टी-20 स्पर्धेला सुरूवात होणार आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर भारतात 2020-2021 या मोसमाची सुरूवात याच स्पर्धेने होत आहे. राहुल त्रिपाठीशिवाय केदार जाधव, ऋतुराज गायकवाड हे खेळाडूही महाराष्ट्राच्या टीममध्ये आहेत. ऋतुराज गायकवाड याने आयपीएलच्या या मोसमात चेन्नईकडून धमाकेदार कामगिरी केली होती. महाराष्ट्राच्या एलीट ग्रुपमध्ये गुजरात, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, बडोदा आणि उत्तराखंडच्या टीम आहेत. या ग्रुपच्या सगळ्या मॅच बडोद्यामध्ये खेळवल्या जाणार आहेत. महाराष्ट्राची टीम राहुल त्रिपाठी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, नौशाद शेख, केदार जाधव, रणजीत निकम, अजीम काजी, निखील नाईक, विशांत मोरे, सत्यजीत बचाव, तरणजीत सिंग ढिल्लोन, एस काजी, प्रदीप डाधे, मुकेश चौधरी, मनोज इंगळे, दिव्यांग हिणगावकर, राजवर्धन हंगारगेकर, जगदीश जोप, स्वप्निल गुगाले, धनराज परदेशी, सन्नी पंडित दुसरीकडे मुंबईच्या टीमचं नेतृत्व सूर्यकुमार यादव याच्याकडे देण्यात आलं आहे. याशिवाय आदित्य तरे, धवल कुलकर्णी, सिद्धेश लाड, तुषार देशपांडे, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांनाही मुंबईच्या टीममध्ये संधी देण्यात आली आहे. मुंबईची टीम सूर्यकुमार यादव (कर्णधार), आदित्य तरे, यशस्वी जयसवाल, आकर्षित गोमेल, सरफराज खान, सिद्धेश लाड, शिवम दुबे, शुभम रांजणे, सुजीत नायक, साईराज पाटील, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी, मिनाद मांजरेकर, प्रथमेश डाके, अथर्व अंकोलेकर, शशांक अत्तारदे, शम्स मुलानी, हार्दिक तामोर, आकाश पारकर आणि सूफियान शेख श्रीसंतचं पुनरागमन केरळनेही या स्पर्धेसाठी टीमची घोषणा केली आहे. या टीममध्ये श्रीसंतनं सात वर्षानंतर पुनरागमन झालं आहे. स्पॉट फिक्सिंगप्रकरणात नाव समोर आल्यानंतर श्रीसंतवर सात वर्षांची बंदी घालण्यात आली होती. केरळची टीम संजू सॅमसन, सचिन बेबी, जलज सक्सेना, रॉबिन उथप्पा, विष्णू विनोद, सलमान निजार, बासील थंपी, एस श्रीसंत, एम निधीश, केएम आसिफ, अक्षय चंद्रन, पीके मिधुन, अभिषेक मोहनलाल, विनूप मनोहरन, मोहम्मद अझहरुद्दीन, रोहन, एस मिधुन, वात्सल गोविंद शर्मा, केजी रोजित, एमपी श्रीरूप
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या