मुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी

मुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी

गेली कित्येक दशकं क्रिकेटवर राज्य केलेल्या मुंबई (Mumbai) साठी आजचा दिवस काळा ठरला असंच म्हणावं लागेल. सय्यद मुश्ताक अली (Syed Mushtaq Ali) स्पर्धेमध्ये पुदुच्चेरीविरुद्धच्या टीममध्ये मुंबईचा फक्त 94 रनवर ऑल आऊट झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 17 जानेवारी : गेली कित्येक दशकं क्रिकेटवर राज्य केलेल्या मुंबई (Mumbai) साठी आजचा दिवस काळा ठरला असंच म्हणावं लागेल. सय्यद मुश्ताक अली (Syed Mushtaq Ali) स्पर्धेमध्ये  पुदुच्चेरीविरुद्धच्या टीममध्ये मुंबईचा फक्त 94 रनवर ऑल आऊट झाला आहे. या मॅचमध्ये पुदुच्चेरीने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर बॅटिंगला आलेल्या मुंबईची सुरूवात चांगली झाली नाही. स्कोअरबोर्डवर 13 रन झाले असतानाच आदित्य तरे आऊट झाला. यानंतर लागोपाठ मुंबईच्या विकेट गेल्या. मुख्य म्हणजे पुदुच्चेरीच्या टीममध्ये एकही स्टार खेळाडू नसतानाही मुंबईच्या टीमची झालेली ही अवस्था मानहानीकारकच म्हणावी लागेल.

ऑलराऊंडर शिवम दुबे (Shivam Dubey) याने सर्वाधिक 28 रन केले. अंडर-19 आणि आयपीएलमध्ये दिमाखदार कामगिरी करणारे यशस्वी जयस्वाल (Yashaswi Jaiswal), सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav), सरफराज खान (Sarfaraz Khan), शिवम दुबे यांच्यासारखे खेळाडू असतानाही मुंबईला 100 रनही गाठता आले नाहीत. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) फक्त 3 रन करून आऊट झाला.

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या नॉक आऊटमध्ये जाण्यासाठीचं मुंबईचं आव्हान आधीच संपलं आहे. पुदुच्चेरीच्या मॅचआधी झालेल्या तीनही मॅचमध्ये मुंबईला पराभव पत्करावा लागला होता. दिल्लीविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये त्यांचा 76 रनने, केरळविरुद्ध 8 विकेटने आणि हरियाणाविरुद्धही 8 विकेटने पराभव झाला होता.

Published by: Shreyas
First published: January 17, 2021, 3:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या