SAvsPAK: फाफ डू प्‍लेसीसने रचला इतिहास, 'असा' विक्रम करणारा जगातील पहिलाच कर्णधार

SAvsPAK: फाफ डू प्‍लेसीसने रचला इतिहास, 'असा' विक्रम करणारा जगातील पहिलाच कर्णधार

केपटाउन कसोटीत दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आफ्रिकेने पाकिस्तानी संघाला अवघ्या 177 धावांत गुंडाळलं. तर आफ्रिकेने दुसऱ्या दिवसअखेर 6 बाद 382 धावा केल्या आहेत.

  • Share this:

केपटाउन, 5 जानेवारी : क्रिकेटमध्ये दररोज नवनवे विक्रम होत असतात. यातील काही विक्रम मिरवण्यासारखे तर काही खराब असतात. मात्र दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसीसच्या नावावर विचित्र विक्रम जमा झाला आहे.

पाकिस्तानविरुद्ध सेंच्युरियन कसोटीतील दोन्ही डावांत फाफ डू प्‍लेसी शून्यावर बाद झाला. तर केपटाउनवर त्याने शतक केले. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच कर्णधार बनला आहे.

केपटाउन कसोटीत दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आफ्रिकेने पाकिस्तानी संघाला अवघ्या 177 धावांत गुंडाळलं. तर आफ्रिकेने दुसऱ्या दिवसअखेर 6 बाद 382 धावा केल्या आहेत.

फाफ डू प्लेसीसने 226 चेंडूत 13 चौकारांच्या साहाय्याने 103 धावांची खेळी केली. त्याला शाहीन आफ्रिदीने यष्टीरक्षक सर्फराज अहमदकरवी झेलबाद केलं. हे त्याचं 9 वं कसोटी शतक आहे.

फाफ डू प्लेसी हा जगातील पहिला असा कर्णधार बनला ज्यानं पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या कसोटीत शतक केलंय.

आफ्रिकेकडून अशी कामगिरी करणारा फाफ डू प्लेसीस तिसरा खेळाडू आहे. त्याच्या अगोदर अशी कामगिरी जॅकी मॅक्गलेव (इंग्लंडविरुद्ध, 1955) आणि जॅक कॅलिस (श्रीलंकेविरुद्ध, 2012) यांनी केली होती.

सेंच्युरियन कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्‍लेसी आणि पाकिस्‍तानचा कर्णधार सर्फराज अहमद हे दोघेही दोन्ही डावात शून्यावर बाद झाले होते. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दोन्ही कर्णधारांनी शून्यावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

VIDEO: सरकारी नोकऱ्या कमी असल्याने आरक्षणाचा फारसा उपयोग नाही : मुख्यमंत्री फडणवीस

First published: January 5, 2019, 5:00 PM IST

ताज्या बातम्या