‘अब अंडरग्राऊंड होने का समय है’! गांगुली अध्यक्ष झाल्यावर नेटकऱ्यांनी घातला धुमाकूळ

‘अब अंडरग्राऊंड होने का समय है’! गांगुली अध्यक्ष झाल्यावर नेटकऱ्यांनी घातला धुमाकूळ

सौरव गांगुलीची अध्यक्षपदी निवड झाल्यावर टीम इंडियाच्या खेळाडूंचे टेंशन वाढले.

  • Share this:

मुंबई, 15 ऑक्टोबर : भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची आज बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. दरम्यान 23 ऑक्टोबरला बीसीसीआयच्या निवडणुकीत या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. बीसीसीआयच्या सर्व अधिकाऱ्यांनी यावर सहमती दर्शवली आहे. दरम्यान सर्व खेळाडूंपासून ते बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत सर्वांनी कौतुकांचा वर्षाव केला.

सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या बातमीमुळं सोशल मीडियावर वेगवेगळे ट्रेंडही येण्यास सुरुवात झाली आहे. यात नेटकऱ्यांनी रवी शास्त्रींना टार्गेट केले आहे. शास्त्री आणि गांगुली यांचे वाद जगजाहीर आहेत. 2017मध्ये विराट आणि अनिल कुंबळे यांच्यात झालेल्या वादानंतर कुंबळेंनी राजीनामा दिला. त्यानंतर रवी शास्त्रींना प्रशिक्षकपद देण्यास गांगुलीचा नकार होता. त्यामुळं गांगुलीच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीमुळं रवी शास्त्रींच्या अडचणी वाढू शकतात एवढे मात्र नक्की.

10 महिन्यासांठी झाली निवड

मैदानात भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केलेला 47 वर्षीय गांगुली सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशन(CAB)चा अध्यक्ष आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीचं नाव जवळपास निश्चित झालं असलं तरी तो फक्त 10 महिनेच या पदावर राहू शकतो. त्यामुळे तो सप्टेंबर 2020पर्यंत या पदावर राहू शकेल. याचबरोबर जय शहा आणि अरुण सिह धुमल यांचीही 10 महिन्यांसाठी निवड झाली आहे.

VIDEO : विधानसभा निवडणुकीत वंचितचं भविष्य काय? रामदास आठवले म्हणाले...

First published: October 15, 2019, 7:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading