सौरव गांगुलीची BCCIच्या अध्यक्षपदी निवड, अमित शहांच्या मुलाची सचिवपदी नियुक्ती

सौरव गांगुलीची BCCIच्या अध्यक्षपदी निवड, अमित शहांच्या मुलाची सचिवपदी नियुक्ती

बीसीसीआचे माजी उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आज याबाबत घोषणा केली.

  • Share this:

मुंबई, 14 ऑक्टोबर : भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बीसीसीआचे माजी उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आज याबाबत घोषणा केली. 13 ऑक्टोबरला रात्री उशीरापर्यंत झालेल्या बैठकीत सौरव गांगुलीच्या नावावर अधिकृच शिक्कामोर्तब करण्यात आला. दरम्यान सोमवारी, 14 ऑक्टोबरला राजीव शुक्ला यांनी याबाबत नियुक्ती केली.

राजीव शुक्ला यांनी याबाबत माहिती देताना, “आम्ही सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. तरी, 23 ऑक्टोबरला याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल”, असे सांगितले. 23 ऑक्टोबर रोजी बीसीसीआयची निवडणुक होणार आहे. दरम्यान अध्यक्षपदासाठी सौरव गांगुलीनं एकट्यानं फॉर्म भरल्यामुळं बिनविरोधात निवड झाली आहे.

तर, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा सचिव असतील. मैदानात भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केलेल्या 47 वर्षीय गांगुली सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशन(CAB)चा अध्यक्ष आहे. जर गांगुलीची आता बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली तर तो सप्टेंबर 2020पर्यंत या पदावर राहू शकेल.

गांगुलीची अध्यक्षपदी निवड झाली तर कर्नाटचे बृजेश पटेल यांची आयपीएलच्या गव्हर्निंग काऊंसिलच्या अध्यक्षपदी नियुक्ती होऊ शकते. बीसीसीआयच्या अपेक्स काऊंसिलमध्ये 9 सदस्य आहेत. त्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, संयुक्त सचिव, क्रिकेटर्स असोसिएशनचा एक पुरुष प्रतिनिधी, एक महिला प्रतिनिधी, आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलचा एक प्रतिनिधी आणि केंद्र सरकारचा एक प्रतिनिधी यांचा समावेश असतो.

Loading...

10 महिन्यासांठी BCCIच्य़ा अध्यक्षपदी

मैदानात भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केलेला 47 वर्षीय गांगुली सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशन(CAB)चा अध्यक्ष आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीचं नाव जवळपास निश्चित झालं असलं तरी तो फक्त 10 महिनेच या पदावर राहू शकतो. त्यामुळे तो सप्टेंबर 2020पर्यंत या पदावर राहू शकेल. नुकतीच सौरव गांगुलीची सीएबीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यामुळे गांगुलीला बीसीसीआयच्या नव्या संविधानानुसार कूलिंग ऑफ पीरियडमध्ये जावं लागेल. त्याला पुढच्या तीन वर्षांपर्यंत बीसीसीआयचं कोणंतही पद भूषवता येणार नाही.

VIDEO : विधानसभा निवडणुकीत वंचितचं भविष्य काय? रामदास आठवले म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2019 03:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...