VIDEO : सौरव गांगुलीची ही दमदार फटकेबाजी तुम्ही पाहिलीत का?

VIDEO : सौरव गांगुलीची ही दमदार फटकेबाजी तुम्ही पाहिलीत का?

मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि गांगुली यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीचा संघ आपले पहिले जेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 मार्च : एकेकाळी आपल्या फलंदाजीच्या जोरावर गोलंदाजांची पिसं काढणारा भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली निवृत्तीनंतर मैदानापासून लांब आहे. त्यामुळे गांगुलीला फलंदाजी करताना पाहणं म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. सध्या गांगुली आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रमुख सल्लागार म्हणून काम पाहत आहे. मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि गांगुली यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीचा संघ आपले पहिले जेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक आहे.

आयपीएलच्या सुरूवातीच्या काही हंगामात कोलकाता नाइट रायडर्स आणि पुणे वॉरियर्स संघाकडून गांगुलीनं मैदानात फटकेबाजी केली होती. असाच काहीसा गांगुलीचा अंदाज दिल्ली कॅपिटल्सच्या सराव सत्रात दरम्यान पाहायला मिळाला. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गांगुलीनं केलेल्या या बॅटिंगचा आनंद दिल्लीच्या खेळाडूंनी घेतला. गांगुलीनेही कट शॉट्स आणि कव्हर ड्राईव्ह लगावत चाहत्यांना खूश केले. दिल्ली कॅपिटल्सने गांगुलीच्या फटकेबाजीचा व्हिडीओ शेअर केला.

दिल्लीनं आपल्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर नमवले, परंतु दुसऱ्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. दिल्लीचा तिसरा सामना शनिवारी आपल्या घरच्या मैदानावर कोलकाता विरोधात होणार आहे. याकरिता खेळाडूंनी गुरुवारपासून कसुन सरावास सुरुवात केली आहे.

POINTS TABLE:

SCHEDULE TIME TABLE:

ORANGE CAP:

PURPLE CAP:

RESULTS TABLE:

VIDEO: पुण्यात मेट्रोचं कामावेळी सापडले दोन भुयारी मार्ग

First published: March 29, 2019, 7:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading