IPL 2019 : गांगुलीची ‘या’ नियमातून तुर्तास सुटका, दिल्लीसाठी चिअर करण्यास सौरव सज्ज

IPL 2019 : गांगुलीची ‘या’ नियमातून तुर्तास सुटका, दिल्लीसाठी चिअर करण्यास सौरव सज्ज

सध्या गांगुली सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा सल्लागार अशा दुहेरी भूमिका सांभाळत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 एप्रिल: बंगाल क्रिकेट संघाचा अध्यक्ष, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या विरोधात परस्पर हितसंबंध जोपासल्याबद्दल केलेल्या तक्रारीनंतरही आयपीएलमध्ये दिल्लीसाठी गांगुली चिअर करु शकतो.

तीन क्रिकेट चाहत्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) लवाद अधिकाऱ्यांकडे गांगुली विरोधात तक्रार केली होती. गांगुली सध्या आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स या संघाकरिता सल्लागार म्हणून काम करत आहे. दरम्यान दोन भूमिका सांभाळणाल्याबद्दल त्याची तक्रार करण्यात आली होती. बीसीसीआयच्या सुत्रांनुसार न्यायमुर्ती डी. के. जैन यांनी अंतिम निर्णय घेण्याआधी गांगुलीची बाजू ऐकून घेणार असल्याचे सांगितले. मात्र दिल्लीच्या सल्लागारपदाबाबत कोणताही अडथळा येणार नसल्याचेही बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.

या निर्णयामुळं दिल्ली आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामना १२ एप्रिलला होणार असून त्यावेळी दिल्लीच्या संघाच्या ‘डग-आऊट’मध्ये बसण्यास गांगुलीला कोणतीही अडचण येणार नाही आहे. या प्रकरणासंदर्भात अंतिम निकाल देण्याआधी लवाद अधिकारी डी. के. जैन हे गांगुली यांची पूर्ण भूमिका समजून घेणार आहेत. गांगुलीने त्याच्याकडून केलेल्या खुलाशात या प्रकरणात कोणतेही परस्पर हितसंबंध जोपासले नसल्याचे म्हटले आहे.

सध्या गांगुली सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा सल्लागार अशा दुहेरी भूमिका सांभाळत आहे. त्यामुळं या वादाला सुरूवात झाली. दरम्यान या तक्रारीवर निकाल लागेपर्यंत गांगुली दिल्ली संघाला चिअर करु शकतो.

VIDEO: उमेदवाराने चक्क ईव्हीएमच जमिनीवर आदळलं

First published: April 11, 2019, 4:53 PM IST
Tags: ipl 2019

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading