नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : सोशल माडियावर क्षणाक्षणाला काही ना काही करी व्हायरल होत असते. दरम्यान, टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माचा (Rohit Sharma Latest Photo Viral) एक फोटो सध्या सोशल माडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला सरबत पिताना दिसत आहे. हा फोटो पाकिस्तानातील आहे. रोहितचा हा व्हायरल झालेला फोटो पाहुन चाहते भलतेच कन्फ्युज झाले होते. मात्र, तो रोहित नाही तर दुसरातच कोणतरी व्यक्ती असून रोहित शर्मासारखा (Rohit Sharma's doppelganger takes internet by storm) हुबेहुब दिसत आहे. हे समजल्यावर नेटकऱ्यांनी मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians in IPL 2021) सततच्या पराभवाचा मुद्दा उचलुन धरत रोहित शर्माची खिल्ली उडवण्यास सुरवात केली आहे.
रोहित शर्मासारखा हुबेहुब दिसणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो ट्विटरवर @ShirazHassan या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला. या फोटोत एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला बसून सरबत पिताना दिसत आहे. दिसायला ही व्यक्ती हुबेहूब रोहित शर्मासारखी आहे.
हे वाचा-IND W vs AUS W: ऐतिहासिक टेस्टमध्ये स्मृतीचा धमाका, भारताची दमदार सुरूवात
हा फोटो शेअर करताना @ShirazHassan यांनी कॅप्शनमध्ये रोहित शर्माच्या नावाचा उल्लेख करत अखेर कोण म्हणतं की पाकिस्तान आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्ससाठी सुरक्षित नाही. असा खोचक सवाल उपस्थित केला आहे.
Who said Pakistan is not safe for visiting international cricketers? Just saw star Indian player Rohit Sharma, enjoying a glass of Aalu Bukhara (plum) sharbat at Rawalpindi's saddar.
(Photo: Mukhtar Aziz Kansi) pic.twitter.com/GN1gG8N2jT — Shiraz Hassan (@ShirazHassan) September 27, 2021
''कोण म्हणतं की पाकिस्तान आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्ससाठी सुरक्षित नाही. भारताचा क्रिकेटर रोहित शर्मा रावळपिंडीमध्ये आलू बुखारचे सरबत पिताना दिसतोय.'' असे @ShirazHassan यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे. रोहितसारखा हुबेहुब दिसणाऱ्या या व्यक्तीचा फोटो सोशल माडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हे वाचा-टीम इंडियातील वादावर BCCI ची पहिली प्रतिक्रिया, विराट कोहलीवर दिलं स्पष्टीकरण
आयपीएलमधील सध्याचा मुंबई इंडियन्सचा फार्म बघता नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली. एका चाहत्यानेहा फोटो शेअर करत लिहिले, "हा कमी बजेटचा हिटमॅन आहे." तर, दुसऱ्या एकाने लिहिले, "त्यांना शरबतची गरज आहे. मुंबई इंडियन्सला सतत पराभव स्विकारावा लागत आहे, त्यामुळे दबाव हाताळण्यासाठी त्यांना शरबत महत्वाचे आहे." असे म्हंटले आहे.
That's low budget Hitman...
— Soumik (@PallabIam) September 27, 2021
He’s gone over there to regroup and think how he will change the fortunes of Mumbai Indians!!
— AR (@Edge2slip) September 27, 2021
आयपीएलच्या 14 (IPL 2021) व्या पर्वातील 42 वा सामना मंगळवारी अबुधाबीच्या शेख झायद मैदानात खेळवला गेला. मुंबई इंडियन्सने अखेर या सामन्यात विजय मिळवला. दुसऱ्या पर्वाच्या सुरुवातीपासून सलग तीन सामने पराभूत झाल्यानंतर मुंबईने पंजाब किंग्जवर (MI vs PBKS) 6 विकेट्सनी विजय मिळवला. दरम्यान या सामन्यानंतर लगेचच संघात एक बदल करण्यात आला आहे. संघाचा युवा खेळाडू अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याच्या जागी सिमरनजीत सिंग (Simranjeet singh) याला संधी देण्यात आली आहे.
मुंबई इंडियन्स संघाचे उर्वरीत सामने
– 02 ऑक्टोबर (शनिवार): मुंबई vs दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3:30 वाजता, शारजाह
– 05 ऑक्टोबर (मंगळवार): मुंबई vs राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह
– 08 ऑक्टोबर (शुक्रवार): मुंबई vs सनरायजर्स हैद्राबाद, दुपारी 7:30 वाजता, अबू धाबी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Mumbai Indians, Pakistan, Rohit sharma