'नाणेफेक जिंकून पाकिस्तानने केली मोठी चूक' ICC Cricket World Cup 2019 | india vs pakistan

'नाणेफेक जिंकून पाकिस्तानने केली मोठी चूक' ICC Cricket World Cup 2019 | india vs pakistan

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयावर आता टीका सुरु झाली आहे.

  • Share this:

मँचेस्टर, 16 जून: आयसीसी वर्ल्डकपमधील भारताविरुद्धच्या हायवोल्टेज सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे नाणेफेक झाल्यानंतर विराट कोहलीने देखील प्रथम गोलंदाजी करण्यास आवडले असते असे म्हटले होते. भारताच्या डावाची सुरुवात ए.के.राहुल आणि रोहित शर्मा यांनी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 136 धावांची भागिदारी केली. रोहित शर्माने पकिस्तानविरुद्ध शतकी खेळी केली. भारताने जवळ जवळ 6च्या सरासरीने धावा केल्या आहेत. एकूण सध्या भारताची या सामन्यावर पकड दिसत आहे. यावरून पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयावर आता टीका सुरु झाली आहे. ही टीका अन्य कोणी नव्हे तर खुद्द पाकिस्तानमधून केली जात आहे.

पाकिस्तानच्या माजी जलद गोलंदाज शोएब अख्तर याने सरफराजचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. 2017मध्ये चॅम्पियन चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने जी चूक केली होती तिच चूक आता सरफराजने केल्याचे शोएबने म्हटले आहे. विराटने त्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता.World Cup : INDvsPAK : पहिल्याच सामन्यात केएल राहुलची रोहितसोबत विक्रमी भागिदारी

शोएबच्या या ट्विटवर पाकिस्तानी चाहत्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. काहींच्या मते हा सामना आता संपला आहे. पाकिस्तानचा पुन्हा एकदा पराभव होणार असे पाकच्या चाहत्यांनी म्हटले आहे. अर्थात काहींनी शोएबवर टीका देखील केली आहे. अद्याप सामा बराच शिल्लक असल्याचे काहींनी म्हटले आहे. वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 6 वेळा सामने झाले. यात सर्व सामने भारताने जिंकले आहेत. यंदा 12 वा वर्ल्ड कप होत असून भारताने दोनवेळा तर पाकिस्तानने एकदा विजेतेपद पटकावलं आहे. गेल्या सहा वर्षांपासून भारत पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका झालेली नाही. फक्त आयसीसीच्या स्पर्धेत दोन्ही संघ आमने सामने येतात.


VIDEO : माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी आधी पुरावे सादर करावे - उदयनराजेबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2019 05:42 PM IST

ताज्या बातम्या