IPL 2019 : जेव्हा सर्फराज आपली भीती हॉटेलवर सोडून येतो तेव्हा...

IPL 2019 : जेव्हा सर्फराज आपली भीती हॉटेलवर सोडून येतो तेव्हा...

सर्फराज या युवा खेळाडूचा हा अप्रतिम शॉट पाहून बेन स्ट्रोकही झाला थक्क.

  • Share this:

जयपूर, 26 मार्च : राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांचा सामना बऱ्याच गोष्टींमुळे गाजला. मग त्यात गेलची आतषबाजी असो किंवा पंजाबचा कर्णधार आर अश्विननं जॉस बटलरला मंकडिंग पध्दतीनं केलेले बाद असो. या सगळ्यामुळे सोमवारी (25 मार्च) संपलेल्या सामन्याची चर्चा आतापर्यंत होत आहे. पंजाबनं 14 धावांनी राजस्थानवर विजय मिळवला. पण या सगळ्यात आकर्षणाचा विषय ठरला तो, 21 वर्षीय मुंबईकर खेळाडू सर्फराज खान.सर्फराझनं राजस्थान विरुद्धच्या सामन्यात 46 धावांची तुफानी खेळी केली. त्यात त्याचा मागे भिरकवून मारलेला स्कूप शॉट चांगलाच गाजला. याबाबत सामन्यानंतर सर्फराजचा सहखेळाडू के.एल राहूल यानं मस्करीत, सर्फराझला तुला असे शॉट खेळताना भिती वाटत नाही का, असं विचारलं असता, भिती मी हॉटेलवर सोडून येतो असे उत्तर दिले. सर्फराजनं फलंदाजी करताना, 20वी ओव्हर चांगलीच गाजवली. त्याच्या चौकार आणि षटकारांमुळे पंजाबनं 180चा आकडा पार केला. तर सर्फराजचा हा अनोखा शॉट पाहून राजस्थानचा फलंदाज बेन स्ट्रोकलाही हसु आवरता आलं नाही. सर्फराजचा हा शॉट पाहून श्रीलंकेचा फलंदाज तिलकरत्न दिलशान याचा दिलस्कुप शॉट आठवला.प्रथम श्रेणीत मुंबईकडून खेळणाऱ्या या 21 वर्षीय फलंदाजाने याआधी प्रथम श्रेणीतील स्पर्धा चांगल्याच गाजवल्या आहेत. त्यानंतर त्याने उत्तर प्रदेश संघाकडून खेळण्यास सुरूवात केली. सर्फराझच्या प्रथम श्रेणीतील खेळीच्या जोरावर 13 एप्रिलला पंजाब विरुद्ध बंगळुरू असा सामना पंजाबच्या होमग्राऊंडवर रंगणार आहे. या सामन्यात सर्फराज विराटच्या या अविश्वासाला उत्तर देण्यासाठी उत्सुक असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: Mar 26, 2019 04:41 PM IST

ताज्या बातम्या