पाकिस्तानची नवी खेळी, सरफराजला हटवत त्यांच्या ‘विराट’ला दिलं कर्णधारपद

पाकिस्तानची नवी खेळी, सरफराजला हटवत त्यांच्या ‘विराट’ला दिलं कर्णधारपद

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या पाकिस्तानी संघात मोठे बदल करण्यात आले आहे.

  • Share this:

कराची, 18 ऑक्टोबर : पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या पाकिस्तानी संघात मोठे बदल करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या वतीनं कसोटी आणि टी-20साठी दोन कर्णधारांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळं अखेर पाकचा कर्णधार सरफराजला डच्चू देण्यात आला आहे. त्याच्या जागी अझर अलीची कसोटी कर्णधार म्हणून तर बाबर आझमची टी-20 कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.

सरफराज अहमदच्या नेतृत्वाखाली 2017मध्ये चॅम्पियन ट्रॉफी खेळल्यानंतर पाक संघाची कामगिरी खालवली होती. त्यामुळं त्याला कर्णधारपदावरून हटवण्याक आले आहे. तर, बाबर आझमला पाकिस्तानचा विराट कोहली म्हणून ओळखले जाते. बाबर टी-20 क्रिकेट रॅकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. बाबरची तुलना ही नेहमी विराट कोहलीशी केली जाते, त्याचे कारण म्हणजे दोघांच्या दिसण्यात आणि खेळण्यात असलेले साम्य.

टी-20मध्ये बाबरच्या नावावर 4 हजार 962 धावा आहेत. एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं 50च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. त्यामुळं बाबर आणि अझर अली यांच्या नेतृत्वाखाली टी-20 वर्ल्ड आणि टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये पाक चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.

सरफराजच्या कर्णधारपदामुळं पाकिस्तानचे झाले नुकसान

2017मध्ये चॅम्पियन ट्रॉफीनंतर पाकिस्ताननं निराशाजनक कामगिरी केली. सरफराजच्या नेतृत्वाखाली पाकचा संघ आशियाई कपमध्ये फायनलपर्यंतही मजल मारू शकली नाही. तर, आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019मध्ये सेमीफायनलमध्ये प्रवेश करता आला नाही. त्याशिवाय घरच्या मैदानावर तब्बल 10 वर्षांनी खेळत असूनही श्रीलंकेविरोधात टी-20 मालिका 3-0नं गमावली. त्यानंतर सरफराजला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी जोर धरत होती.

'चंपा'वर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, राज ठाकरे यांना म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2019 02:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading