मुंबई, 14 फेब्रुवारी : पाकिस्तानी क्रिकेट टीममधल्या (Pakistan Cricket) वादाला जुना इतिहास आहे. पाकिस्तानचे अनेक खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये एकमेकांशी भांडल्याचं अनेकवेळा समोर आलं आहे. यामध्ये आता सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) आणि मोहम्मद हफीज (Mohammad Hafeez) याची भर पडली आहे. मोहम्मद हफीजने केलेलं एक ट्विट सरफराज अहमदला चांगलंच बोचलं, यानंतर सरफराजने हफीजला टीममध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नकोस, असा सल्ला दिला.
मोहम्मद हफीजने ट्विट करत सध्याचा विकेट कीपर मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) पाकिस्तानचा नंबर-1 विकेट कीपर असल्याचं म्हणलं. यावर सरफराज अहमदने प्रतिक्रिया दिली. 'हफीज भाई साहेब, पाकिस्तानसाठी इम्तियाज अहमद, वसीम बारी, तस्लीम आरीफपासून सलीम युसूफ आणि मोईन खान, राशीद लतीफपासून कामरान अकमल आणि रिझवानपर्यंत सगळे नंबर वन विकेट कीपर आहेत, त्यांचा कायमच सन्मान झाला पाहिजे,' अशी प्रतिक्रिया सरफराज अहमदने दिली.
'टीममध्ये फूट पाडू नकोस. आम्ही सगळे रिझवानला पाठिंबा देत आहोत. पाकिस्तानसाठी त्याने आणखी शानदार खेळी कराव्या, अशी आमची इच्छा आहे. भविष्यात ज्याला पाकिस्तानकडून खेळण्याची संधी मिळेल, तो नंबर वनच असेल,' असंही सरफराज अहमद म्हणाला.
Hafeez bhai Sb, whoever has played for Pakistan from Imtiaz Ahmed, Wasim Bari, Tasleem Arif to Saleem Yousuf and from Moin Khan, Rashid Latif to Kamran Akmal and even Rizwan right now has always been number ONE for the country and have been respected accordingly. https://t.co/dF7BScOurl
— Sarfaraz Ahmed (@SarfarazA_54) February 12, 2021
सरफराजला आमीरची साथ
दुसरीकडे सरफराज अहमदला पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर मोहम्मद आमीरची साथ मिळाली आह. आमीरने ट्विट करत सरफराजचं कौतुक केलं. सरफराज तू पाकिस्तानचा नंबर वन विकेटकीपर बॅट्समन आहेस. तुझ्याच नेतृत्वात पाकिस्तान टी-20 मध्ये दोन वर्षांपूर्वी पहिल्या क्रमांकावर पोहोचली. तू कर्णधार असताना पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली. तू पाकिस्तानची शान आहेस. लोकांचं काम बोलणं आहे, असं मोहम्मद आमीर म्हणाला.
रिझवानने केलं शतक
मोहम्मद रिझवानने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (Pakistan vs South Africa) टी-20 मॅचमध्ये शतक केल्यानंतर या वादाला सुरूवात झाली. पहिल्या टी-20 मध्ये रिझवानने 64 बॉलमध्येच नाबाद 104 रन केले, यामध्ये 7 सिक्स आणि 6 फोरचा समावेश होता. रिझवानच्या या शतकामुळे पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा रोमांचक मॅचमध्ये 3 रनने पराभव केला. यानंतर रिझवानने विकेटच्या मागेही चांगली कामगिरी केली. मॅचमध्ये त्याने एक रन आऊट केला आणि एक कॅच पकडला. यानंतर शनिवारी झालेल्या दुसऱ्या टी-20 मध्येही रिझवानने 51 रन केले. रिझवानने पाकिस्तानसाठी 13 टेस्टमध्ये 754, 35 वनडेमध्ये 730 आणि 27 टी-20 मध्ये 417 रन केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.