44 वर्षांपूर्वी तिनं मैदानात भारतीय फलंदाजाला केलं होतं किस, #SareeTwitter VIDEO VIRAL

44 वर्षांपूर्वी तिनं मैदानात भारतीय फलंदाजाला केलं होतं किस, #SareeTwitter VIDEO VIRAL

1975 साली मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारत-वेस्टइंडिज यांच्यातील सामन्यात हा प्रकार घडला होता.

  • Share this:

मुंबई, 18 जुलै : सोशल मीडियावर काय आणि कधी ट्रेंड होईल हे सांगता येत नाही. सध्या असाच एक ट्रेंड ट्विटरवर वेगाने व्हायरल होतो आहे, #Sareetwitter. या ट्रेंडमुळे साडीचं सौंदर्य, परंपरा यावर बरीच चर्चा होते आहे. यात आता क्रिकेटचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक मुलगी साडी नेसून लाईव्ह सामन्यात घूसली. एवढेच नाही तर तिनं भारतीय फलंदाजाला किसही केले.

दरम्यान हा व्हिड़िओ आताचा नाही तर तब्बर 44 वर्षे जुना आहे. 1975 साली मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारत-वेस्टइंडिज यांच्यातील सामन्यात भारतीय फलंदाज ब्रजेश पटेल यांनी अर्धशतकी खेळी केली होती. ब्रेजेश यांनी अर्धशतक पूर्ण करताच साडी नेसलेली महिला अचानक मैदानात घुसली आणि ब्रजेश यांना किस केलं.

वाचा- BCCIच्या अहवालात मोठा खुलासा, रोहित-विराट वादावर केले 'हे' भाष्य

का सुरू झाला हा ट्रेंड?

बॉलिवूडच्या स्टार्स, राजकीय नेत्या, पत्रकार या सगळ्याजणी या ट्रेंडमध्ये आपले साडीतले फोटो शेअर करतायत. हा ट्रेंड सोमवारी सकाळपासूनच सुरू झाला. न्यूयॉर्क टाइम्समध्ये साडीबदद्लचा एक लेख छापून आला होता. यामध्ये साडीची परंपरा, सौंदर्य आणि साडीची शोभा यांचं वर्णन करण्यात आलं होतं. यामध्ये साडीचा वाढता ट्रेंड भाजपमुळे सुरू झाला, असं लिहिलं आहे. 2014 मध्ये भाजपनेच साडीचं जोरदार प्रमोशन केलं, असं त्यांनी यात म्हटलं आहे. पण भारतातले लोक याच्याशी सहमत नाहीत.

वाचा-BCCIचा विराट कोहलीला धक्का; प्रशिक्षक निवडीतून केले बाजूला!

VIDEO : प्रेयसीच्या घरी रंगेहात सापडला पती, मग काय पत्नीने धु-धु धुतले

First published: July 18, 2019, 7:59 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading