सारा टेलरला करायचं होतं रविंद्र जडेजाला 'डेट'

सारा टेलरला करायचं होतं रविंद्र जडेजाला 'डेट'

2014 साली रविंद्र जडेजाला एक नाही दोन नाही तर तब्बल 12 ट्विट साराने केले होते.

  • Share this:

26 जुलै : रविवारी झालेल्या आयसीसीच्या महिला विश्वचषकात इंग्लडने भारताचा पराभव केला. पण इंग्लडच्या विजयापेक्षा इंग्लड महिला संघातल्या काही महिला खेळाडूंचीच सध्या जास्त चर्चा होते आहे. त्यात सारा टेलरही खेळाडू सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होते आहे. पण सारा चर्चेत येण्याची ही पहिली वेळ नाही. काही वर्षांपूर्वीही ती प्रचंड ट्रोल झाली होती.

आपल्या सुंदर चेहऱ्यासाठी आणि गोड स्माईलसाठी सारा प्रसिद्ध आहे. आपल्या मास्टर स्ट्रोक्सने गोलंदाजांना हैराण करणाऱ्या साराने एकदा चक्क रविंद्र जडेजा या भारतीय खेळाडूला डेटसाठी विचारलं होतं. 2014 साली रविंद्र जडेजाला एक नाही दोन नाही तर तब्बल 12 ट्विट साराने केले होते. या ट्विटवरून स्पष्ट कळते की तिला रविंद्र जडेजाला डेट करण्याची प्रचंड इच्छा होती. तिच्या पहिल्या ट्विटमध्ये 'आज रात्री तू आणि मी? ' असा प्रश्न तिने जडेजाला विचारला होता. तर एका ट्विटमध्ये उद्या सकाळी पूलवर 10 वाजता भेटायचं का असा प्रश्नही तिनं विचारला होता.

पण बिचाऱ्या साराच्या एकाही ट्विटचं उत्तर रविंद्रने दिलं नाही. इतकंच काय मीडियाने जडेजाला प्रश्न विचारले तेव्हाही जडेजाने उत्तर देणं टाळलं. क्रिकेटच्या ग्राउंडवर कितीही स्ट्रोक मारले असतील तरी हा साराचा स्ट्रोक मात्र बरोबर लागला नाही असं दिसंतय. पण या ट्विटसाठी ती ट्रोल मात्र भरपूर झाली होती.

First published: July 26, 2017, 3:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading