सोशल मीडियावर न्यूड फोटो शेअर करणाऱ्या खेळाडूनं घेतली निवृत्ती! 'हे' आहे कारण

सोशल मीडियावर न्यूड फोटो शेअर करणाऱ्या खेळाडूनं घेतली निवृत्ती! 'हे' आहे कारण

एकेकाळी विराटही होता या खेळाडूचा फॅन.

  • Share this:

लंडन, 28 सप्टेंबर : इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघातील एका खेळाडूनं सर्वांना हैरान केले होते ते आपल्या न्यूड फोटोनं. आता याच खेळाडूनं एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळं क्रिकेट जगतात खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरलेली इंग्लंडची विकेटकीपर फलंदाज सारा टेलरनं आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. 30 वर्षांच्या सारानं वयाच्या 17व्या वर्षी 2006मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

सारा टेलरही आपल्या विकेटकिपींगमुळे ओळखली जाते. मात्र वयाच्या 30व्या वर्षी मानसिक स्वास्थ ठिक नसल्यामुळं सारानं निवृत्तीचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. सारा गेल्या काही वर्षांपासून डिप्रेशनची बळी ठरली होती. त्यामुळंचे तिनं निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. आपल्या निवृत्तीची घोषणा करत सारानं, “हा माझ्यासाठी खुप कठिण निर्णय होता. पण मला माहित आहे, माझ्या आरोग्यासाठी हे गरजेचे आहे. मी माझ्या सहकाऱ्यांचे, ईसीबीचे आणि चाहत्यांचे आभार मानते”, असे सांगितले.

इंग्लंडकडून सारानं आतापर्यंत 10 कसोटी खेळल्या आहेत. यात तिला 300 धावा करता आल्या. कसोटीत तिची सर्वोच्च धावसंख्या 40 आहे. याशिवाय 126 एकदिवसीय सामने खेळताना तिनं 4 हजार 56 धावा केल्या आहेत. यात 7 शतकं आणि 20 अर्धशतकं आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिनं 147 धावा केल्या आहेत. टी20 क्रिकेटमध्येही तिनं 90 सामने खेळले आहेत. यात 29.02 च्या सरासरीनं 2 हजार 177 धावा केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक 77 धावांची खेळी केली आहे. यष्टीरक्षण करताना सारानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 87 झेल आणि 51 यष्टीचित केलं आहे. तर कसोटीत 18 झेल आणि दोन यष्टीचित केले आहेत. टी20मध्ये तिने 23 झेल घेताना 51 फलंदाजांना यष्टीचित केलं आहे.

साराच्या नावावर आहेत अनेक रेकॉर्ड

सारा टेलर जगातील सर्वात लोकप्रिय महिली क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तिनं महिला क्रिकेटच्या इतिहासात 104 स्टम्पिंगचा रेकॉर्ड केला आहे. तसेच, सारानं 232वेळा फलंदाजांना बाद केले आहे. फक्त यष्टीरक्षक म्हणून नाही तर फलंदाज म्हणून 13 वर्षांच्या करिअरमध्ये सारानं 6533 धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सारा दुसऱ्या क्रमांकावर आहे. सारानं 2009 टी-20 वर्ल्ड कर आणि 2017मध्ये इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून दिले होते.

VIDEO: युतीसंदर्भात शिवसेना काय निर्णय घेणार? यासोबत इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 28, 2019 11:21 AM IST

ताज्या बातम्या