Home /News /sport /

Sara Tendulkar : साडी, टिकली, नथ आणि गजरा, मराठमोळ्या लूकमध्ये सजली सचिनची लेक

सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) महाराष्ट्रीयन लग्नाला गेली होती, या लग्नात साराने पारंपारिक मराठी वेष परिधान केला होता. नाकात नथ, डोक्यात गजरा, साडी आणि हातात कलश घेतलेले साराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पुढे वाचा ...
  सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आयपीएल 2022 मध्ये कायमच चर्चेत राहिली. या मोसमात मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक झाली, पण सारा बहुतेक सामन्यांमध्ये मुंबईला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये आली होती. आयपीएलमधलं मुंबईचं आव्हान संपल्यानंतर साराचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Sara Tendulkar/ Social Media)

  या फोटोमध्ये सारा पारंपारिक मराठी वेषात दिसली. साडी, पारंपारिक टिकली आणि दागिने घातलेली सारा लग्नाला गेली होती. सारा तेंडुलकरच्या हातामध्ये कलशही दिसत आहे. (Sara Tendulkar/ Social Media)

  या लग्नासाठी सारा पूर्णपणे मराठी वेषात सजली होती. नाकातल्या नथीपासून ते टिकली, गजरा आणि साडीपर्यंत सगळंच महाराष्ट्रीय पद्धतीचं होतं. साराचे पहिल्यांदाच साडीमधले फोटो समोर आले आहेत. (Sara Tendulkar/ Social Media)

  लग्नाच्या इतर कार्यक्रमांमध्ये साराने पांढऱ्या रंगाचा सूट घातला होता. यावेळी तिने नातेवाईकांचीही भेट घेतली. सारा शिक्षणासाठी लंडनमध्ये असते, पण काही दिवसांसाठी ती भारतामध्ये आली आहे. (Sara Tendulkar/ Social Media)

  लग्नामध्ये सचिन तेंडुलकर नवविवाहित जोडप्यासह दिसला. मुंबईच्या जे डब्ल्यू हॉटेलमध्ये हे लग्न झालं. लग्नाचे हे फोटो समीर वसईकर यांनी त्यांच्या फेसबूकवर शेयर केले आहेत. (Sachin Tendulkar/ Social Media)

  लग्नामधले सचिन तेंडुलकरचे फोटोही सोशल मीडियातून समोर आले आहेत. (Sachin Tendulkar/ Social Media)

  लग्नाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सचिन सहभागी झाला होता. मराठी रिती रिवाजांनुसार झालेल्या या लग्नात सचिनने निळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. (Sachin Tendulkar/ Social Media)

  सारा तेंडुलकर हातात कलश घेऊन लग्नाचे सगळे रिती रिवाज पूर्ण करताना दिसली, तिच्यासोबत आणखी काही मुली कलश घेऊन उभ्या होत्या. (Sara Tendulkar/ Social Media)

  Published by:Shreyas
  First published:

  Tags: Sachin tendulkar

  पुढील बातम्या