IPL 2019 : 6 4 4 2 4 4... संजू सॅमसनकडून भुवनेश्वर कुमारची धुलाई, पाहा VIDEO

IPL 2019 : 6 4 4 2 4 4... संजू सॅमसनकडून भुवनेश्वर कुमारची धुलाई, पाहा VIDEO

भारताचा भरवशाचा गोलंदाज आणि हैदराबाद संघाचा उप कर्णधार भुवनेश्वर कुमारची संजू सॅमसन या युवा फलंदाजनं चांगलीच धुलाई केली.

  • Share this:

हैदराबाद, 29 मार्च : भारताचा भरवशाचा गोलंदाज आणि हैदराबाद संघाचा उप कर्णधार भुवनेश्वर कुमारची संजू सॅमसन या युवा फलंदाजनं चांगलीच धुलाई केली. आपल्या किफायतशीर गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हैदराबाद संघावर संजू सॅमसन आणि अजिंक्य रहाणे तुटून पडले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान संघाची सुरूवात चांगली झाली नसताना, संजू सॅमसन आणि कर्णधार अजिंक्य रहाणेनं राजस्थानचा डाव सांभाळला. त्यामुळं राजस्थाननं हैदराबाद समोर 199 धावांचे आव्हान ठेवले आहे. त्याचबरोबर सॅमसननं आयपीएलच्या बाराव्या हंगामातील पहिलं शतक ठोकलं. 54 चेंडूत 10 चौकार आणि 6 षटकार मारत संजूनं आपलं शतक पुर्ण केलं.

सिद्धार्थ कौलच्या 17व्या षटकात हैदराबादचा यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोने सॅमसनला 60 धावांवर जीवदान दिले. त्यानंतर संजूचं वादळ गोंगावलं आणि लगेचच पुढच्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारला 24 ( 4 चौकार व 1 षटकार व दोन धावा) धावा चोपल्या. त्यानंतर संजूचं वादळ गोंगावलं आणि लगेचच पुढच्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारला 24 ( 4 चौकार व 1 षटकार व दोन धावा) धावा चोपल्या.

भुवनेश्वरनं आपल्या चार ओव्हरमध्ये 13.8च्या सरासरीनं 54 धावा दिल्या. भुवनेश्वरच्या या एका ओव्हरमुळं राजस्थान संघाचा स्कोर 198 पर्यंत पोहचला. तर, 199 धावांचा पाठलाग करत असताना सनरायझर्स हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरने पहिल्या षटकापासूनच राजस्थानच्या गोलंदाजांवर प्रहार केला.

POINTS TABLE:

SCHEDULE TIME TABLE:

ORANGE CAP:

PURPLE CAP:

RESULTS TABLE:

VIDEO: पुण्यात मेट्रोचं कामावेळी सापडले दोन भुयारी मार्ग

First published: March 29, 2019, 11:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading