वेस्ट इंडिज दौऱ्यात भारताच्या 'या' सात रत्नांची हुकली संधी!

भारतीय संघात सामिल होण्यासाठी आणखी सात खेळाडू उत्सुक होते, ज्यांचा विचार निवड समिती करू शकते.

  • Share this:

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. यात राहुल चहर आणि नवदीप सैनी या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. मात्र भारतीय संघात सामिल होण्यासाठी आणखी सात खेळाडू उत्सुक होते, ज्यांचा विचार निवड समिती करू शकते. 3 ऑगस्टपासून भारत वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहेत.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. यात राहुल चहर आणि नवदीप सैनी या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. मात्र भारतीय संघात सामिल होण्यासाठी आणखी सात खेळाडू उत्सुक होते, ज्याचा विचार निवड समिती करू शकते. 3 ऑगस्टपासून भारत वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहेत.

अंडर-19चा स्टार खेळाडू शुभमन गील यानं आयपीएल 2019मध्ये शानदार खेळी केली होती. त्यामुळं वेस्ट इंडिज दौऱ्यावर गीलला संघात स्थान मिळेल असे वाटत होते, मात्र त्याला संघात संधी मिळू शकली नाही. 9 प्रथम श्रेणी सामन्यात गीलनं 1089 धावा केल्या आहेत. त्यामुळं पुढील मालिकेत त्याला संघात स्थान मिळू शकतात.

प्रत्येक आयपीएलमध्ये संजू सॅमसनची चर्चा होते, मात्र त्याला भारतीय संघात स्थान मिळत नाही. विकेटकिपींगबरोबरच संजू आक्रमक फलंदाजीही करतो. मात्र वेस्ट इंडिज विरोधात संजूच्या नावाचा विचार केला गेला नाही.

वर्ल्ड कपमध्ये 15 खेळाडूंमध्ये जागा बनवणाऱ्या मयंक अग्रवालला वेस्ट इंडिज विरोधात मात्र संघात जागा मिळालेली नाही. त्यानं आतापर्यंत एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. मात्र, त्याला निवड समितीत पुढील मालिकेत संधी देऊ शकते.

21 वर्षांचा मयंक मार्केंडेने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर त्यानं अनेक दिग्गज खेळाडूंना हैराण केले आहे. सात प्रथम श्रेणीत सामन्यात त्यानं 34 विकेट तर लिस्ट एमध्ये 51 विकेट घेतल्या आहेत.

रणजी स्पर्धेत कर्नाटककडून चांगली कामगिरी करणारा ऑलराऊंडर खेळाडू श्रेयस गोपाल यानं आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी केली. त्यामुळं वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याच्या नावाची चर्चा होत होती. मात्र श्रेयसला संघात जागा मिळाली नाही.

22 वर्षांचा आवेश खान आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतो. त्यानं प्रथम श्रेणीत 16 सामने खेळले आहेत यात 58 विकेट घेतल्या. त्यामुळं आवेश खानला संघात जागा मिळू शकते.

निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी भारतीय संघाची घोषणा करताना केएस भारत या खेळाडूचे नाव लिस्टमध्ये असल्याचे जाहीर केले. आंध्र प्रदेशकडून विकेटकीपर आणि फलंदाजी करणाऱ्या या खेळाडूनं भारत ए संघाकडून तीन शतक लगावले आहे. त्यामुळं पुढील मालिकेत केएसचा भारतचा नक्की विचार केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 22, 2019 07:19 PM IST

ताज्या बातम्या