मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: वर्ल्ड कप टीममधून आऊट पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डेत खेळणार हा खेळाडू

T20 World Cup: वर्ल्ड कप टीममधून आऊट पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डेत खेळणार हा खेळाडू

संजू सॅमसनला वन डे संघात संधी?

संजू सॅमसनला वन डे संघात संधी?

T20 World Cup: बीसीसीआय निवड समिती आगामी वन डे मालिकेत संजू सॅमसनला संधी देण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी संजू सॅमसन दक्षिण आफ्रिकेविरद्ध वन डे मालिकेत खेळेल असे संकेत दिले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

मुंबई, 28 सप्टेंबर: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेनंतर लगेचच तीन वन डे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. टी20 वर्ल्ड कपमधून संघात संधी न मिळालेल्या विकेट किपर बॅट्समन संजू सॅमसनला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत संधी मिळाली नाही. पण निवड समिती आगामी वन डे मालिकेत मात्र संजू सॅमसनला संधी देण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी संजू सॅमसन दक्षिण आफ्रिकेविरद्ध वन डे मालिकेत खेळेल असे संकेत दिले आहेत.

वन डे मालिकेत संजूला संधी मिळेल - गांगुली 

मीडियाशी बोलताना गांगुलीनं म्हटलंय की संजू सॅमसन सध्या चांगला खेळत आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये त्याला संधी मिळालेली नाही. पण मला खात्री आहे की त्याच्या नावाचा विचार नक्की झालेला असेल. आयपीएलमध्येही राजस्थान रॉयल्स फ्रॅन्चायझीसाठी त्यानं चांगली कामगिरी केली होती. पण आगामी वन डे मालिकेत त्याला संधी मिळेल अशी आशा आहे.’ असं गांगुलीनं म्हटलंय.

हेही वाचा - T20 World Cup: वर्ल्ड कपआधी वाढलं टीम इंडियाचं टेन्शन, दोन मॅचनंतर या खेळाडूला पुन्हा दुखापत

संजूच्या नेतृत्वात भारत अ विजयी

नुकत्याच झालेल्या भारत अ आणि न्यूझीलंड अ संघातल्या वन डे मालिकेत भारतीय संघ विजयी ठरला होता. संजूच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारत अ संघानं त्या मालिकेत किवी संघाला व्हाईटवॉश दिला होता.

First published:

Tags: Cricket news, Sports, T20 world cup 2022, Team india