मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

संजू सॅमसनने सांगितली चेन्नईविरुद्धच्या पराभवाची कारणं, म्हणाला..

संजू सॅमसनने सांगितली चेन्नईविरुद्धच्या पराभवाची कारणं, म्हणाला..

राजस्थान रॉयल्स टीमचा कॅप्टन संजू सॅमसनने(Sanju Samson)ही मॅच हारण्याचं कारण सांगितलं आहे.

राजस्थान रॉयल्स टीमचा कॅप्टन संजू सॅमसनने(Sanju Samson)ही मॅच हारण्याचं कारण सांगितलं आहे.

राजस्थान रॉयल्स टीमचा कॅप्टन संजू सॅमसनने(Sanju Samson)ही मॅच हारण्याचं कारण सांगितलं आहे.

नवी दिल्ली, 20 एप्रिल : सध्या आयपीएल टी-20 (IPL 2020 ) क्रिकेटस्पर्धा सुरू आहे. या हंगामातील 12 वी मॅच चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात झाली. राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. तर पहिल्यांदा बॅटिंग करत चेन्नई सुपर किंग्जच्या टीमने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावत 188 रन बनवले. 189 रनचे टारगेट चेस करायला मैदानात उतरलेली राजस्थान रॉयल्सची टीम 20 ओव्हरमध्ये केवळ 9 बाद 143 रन काढू शकली.

चेन्नईविरुद्धची ही मॅच हरल्यानंतर राजस्थान रॉयल्स टीमचा कॅप्टन संजू सॅमसनने(Sanju Samson)ही मॅच हारण्याचं कारण सांगितलं. स्पोर्ट्सविकीने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

काय म्हणाला संजू सॅमसन?

'मला वाटतं की हा स्कोअर आम्ही चेस करू शकलो असतो. मात्र,मधल्या काही ओव्हर्समध्ये आम्ही जास्त विकेट गमावल्या. आमच्या बॉलर्सनी चांगली बॉलिंग केली. मात्र, चेन्नईची बॅटिंग जास्त चांगली होती. मैदानावर दव नसूनही बॉल टर्न होत होता. त्यामुळे आमच्याकडून 10 ते 15 रन अतिरिक्त गेले. राजस्थानकडून या वर्षी आयपीएलमध्ये डेब्यू केलेला डावखुरा पेस बॉलर चेतन साकरियाने(Chetan Sakariya)आतापर्यंत दोन मॅचमध्ये 6 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची बॉलिंग प्रभावी आहे. चेतन चांगला खेळत आहे. आज त्याने चेन्नईच्या तीन अनुभवी खेळाडूंना बाद केल्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला असेल,' असं संजू सॅमसन साकरियाबद्दल म्हणाला.‘या फॉरमॅटमध्ये रिस्क रेट जास्त असताना चांगला स्कोर करणं गरजेचं असतं. अशा परिस्थितीत दबावामुळे आऊट होणं नॉर्मल आहे. सध्या मी अनेक गोष्टींवर काम करत आहे. आम्ही ही मॅच हरलो असलो तरी या मॅचमध्ये अनेक सकारात्मक बाबी होत्या.”असंही संजू सॅमसन म्हणाला.

आयपीएलमधील 12 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमने-सामने आले होते. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर(Wankhede Stadium)झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सवर 45 धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली आहे. राजस्थानकडून चेतनने 36धावांत 3 विकेट्स घेतल्या. मॉरिसने 2 तर मुस्तफिजुर आणि तेवतिया यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. चेतन साकरियाने रायडू आणि रैनाला (Suresh Raina) आऊट केलेत्यानंतर त्याने धोनीची (Mahendra singh Dhoni) विकेट घेतली. चेतन हा नवोदित पेस बॉलर आपल्या कल्पक आणि चतुर बॉलिंगने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे. त्याने दिग्गज खेळाडूंना बाद करत राजस्थान रॉयल्सने केलेली त्याची निवड सार्थ ठरवली आहे.

First published:

Tags: IPL 2021, Sanju samson