Vijay Hazare Trophy : 'या' युवा खेळाडूच्या एका द्विशतकानं संपवले ऋषभ पंतचे करिअर!

Vijay Hazare Trophy : 'या' युवा खेळाडूच्या एका द्विशतकानं संपवले ऋषभ पंतचे करिअर!

दक्षिण आफ्रिका विरोधातल्या मालिकेत डच्चू देण्यात आलेल्या ऋषभ पंतचे करिअर धोक्यात.

  • Share this:

केरळ, 13 ऑक्टोबर : भारतात आजही असे खेळाडू आहे, ज्यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही संघात स्थान मिळाले नाही. असेच काहीसे घडले स्थानिक क्रिकेटमध्ये द्विशतकी कामगिरी करणारा फलंदाज संजू सॅमसनबाबत. संजूला टीम इंडियामध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही त्यामुळं ऋषभ पंतच्या जागी त्याला संघात स्थान मिळू शकते.

दुसरीकडे ऋषभ पंतच्या खराब फॉर्ममुळं त्याला संघातून डच्चू देण्यात आला. दक्षिण आफ्रिका विरोधात कसोटी सामन्यात पंत ऐवजी साहाला संधी देण्यात आली. त्यामुळं पंतचे करिअर संजूच्या द्विशतकी खेळीमुळं जवळजवळ संपुष्टात आले आहे. 24 वर्षीय संजूनं 129 चेंडूत 21 चौकार आणि 10 षटकार लगावत 212 धावांची खेळी केली. संजू सॅमसननं चक्क 164.34च्या स्ट्राईक रेटनं ही वादळी खेळी केली. संजूची प्रथम श्रेणी क्रिकेटमधले पहिले द्विशतक आहे.

पंतला किती संधी

धोनीनंतर यष्टीरक्षक म्हणून निवड समितीनं ऋषभ पंतला पसंती दिली जाते. मात्र ऋषभ पंतने 11 कसोटी, 12 एकदिवसीय आणि 20 टी 20 सामन्यात विशेष चांगली कामगिरी केलेली नाही. आता हीच गोष्ट डोकेदुखी वाढवणारी आहे. विंडीजविरुद्ध पंतने दोन एकदिवसीय सामन्यात 30 धावा केल्या. तर तीन कसोटीत 58 धावा करू शकला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिकेत त्यानं 23 धावा केल्या. त्यामुळं आता यापुढे पंतला किती संधी द्यायची असा प्रश्न निवड समितीसमोर निर्माण झाला आहे.

वाचा-आधी टीम इंडियानं नाकारलं; आता लगावले विराट, रोहितपेक्षा जलद द्विशतक

निवड समितीनं पंतसाठी ठेवले पर्याय तयार

दरम्यान, निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी नुकतंच स्पष्ट केलं की, पंतवर असलेल्या जबाबदारीकडे आमचं लक्ष आहे. आम्ही तिनही प्रकारात पंतची जागा घेतील अशा खेळाडूंना तयार करत आहे. आमच्याकडं केएस भारत असून त्यानं इंडिया एसाठी चांगली कामगिरी करत आहे. तर मर्यादीत प्रकारच्या क्रिकेटमध्ये आमच्याकडं इशान किशन आणि संजू सॅमसन आहेत. निवड समितीनं एकप्रकारे पंतला दिलेला हा इशाराच आहे. जर यात इशान किशन, संजू सॅमसन यांनी स्वत:ला सिद्ध केलं तर पंतची जागा ते घेऊ शकतात. अशा परिस्थितीत टी20 वर्ल्ड कपमध्ये या दोघांपैकी एकजण यष्टीरक्षण करताना दिसल्यास नवल नाही.

वाचा-चाहत्यांसाठी खुशखबर! निवृत्तीनंतरही तिसऱ्या कसोटी सामन्यात दिसणार धोनी

दुहेरी शतकासह सॅमसननं केले हे रेकॉर्ड

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये भारताकडून सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, शिखर धवन, करनवीर कौशल आणि संजू सॅमसन यांनी दुहेरी शतक लगावले आहेत. सचिन तेंडुलकर, सेहवाग आणि रोहित यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही दुहेरी शतक लगावले आहे. दरम्यान संजूला आतापर्यंत टीम इंडियात स्थान मिळाले नाही आहे. संजूनं 2015मध्ये भारताकडून फक्त एकमेव टी-20 सामना खेळला होता. तर, 2013मध्ये त्यानं आयपीएलमध्ये पदार्पण केले. संजूनं भारताकडून खेळलेल्या एकमेव टी-20 सामन्यात 19 धावा केल्या होत्या.

वाचा-टीम इंडियाची सुरक्षा वाऱ्यावर! चाहत्यानं भरमैदानात रोहितच्या अंगावर मारली उडी

कुस्ती 'अशां'सोबत होत नाही, हातवारे करून पवारांनी फडणवीसांना फटकारले, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2019 09:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading