हैदराबाद, 29 मार्च : प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान संघाची सुरूवात चांगली झाली नसताना, संजू सॅमसन आणि कर्णधार अजिंक्य रहाणेनं राजस्थानचा डाव सांभाळला. आणि सॅमसननं आयपीएलच्या बाराव्या हंगामातील पहिलं शतक ठोकलं. 54 चेंडूत 10 चौकार आणि 6 षटकार मारत संजूनं आपलं शतक पुर्ण केलं.
सिद्धार्थ कौलच्या 17व्या षटकात हैदराबादचा यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोने सॅमसनला 60 धावांवर जीवदान दिले. त्यानंतर संजूचं वादळ गोंगावलं आणि लगेचच पुढच्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारला 24 ( 4 चौकार व 1 षटकार व दोन धावा) धावा चोपल्या.
A fine century from Samson and a knock of 70 by the Skipper, propel @rajasthanroyals to a total of 198/2.
राजस्थाननं प्रथम टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण सलामीला आलेल्या बाटलरसा केवळ पाच धावात रशिद खाननं माघारी पाठले. त्यानंतर राजस्थानची संपुर्ण जबाबदारी आली ती, अजिंक्य रहाणे आणि संजू सॅम्सन या जोडीवर. या जोडीनं राजस्थान रॉयल्सच्या डावाला खऱ्या अर्थानं आकार दिला. अजिंक्य रहाणेची खेळी 15.5 षटकात संपुष्टात आली. शाहबाद नदीमच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारणाऱ्या रहाणेचा झेल पांडेने टिपला. रहाणेने 49 चेंडूंत 70 धावा केल्या आणि त्यात 4 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता.
POINTS TABLE:
SCHEDULE TIME TABLE:
ORANGE CAP:
PURPLE CAP:
RESULTS TABLE:
VIDEO: पुण्यात मेट्रोचं कामावेळी सापडले दोन भुयारी मार्ग