CWG 2018 : संजिता चानूची सुवर्णभरारी, भारताच्या खात्यात दुसरे सुवर्ण !

CWG 2018 : संजिता चानूची सुवर्णभरारी, भारताच्या खात्यात दुसरे सुवर्ण !

. संजिता चानूने 53 किलो वजनी गटात दुसरं सुवर्णपदक पटकावलंय

  • Share this:

आॅस्ट्रेलिया, 06 एप्रिल : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दुसऱ्या दिवशीही वेटलिफ्टर संजिता चानूची सुवर्ण कामगिरी केलीये.  संजिता चानूने 53 किलो वजनी गटात दुसरं सुवर्णपदक पटकावलंय. संजिता चानू ही मूळ मणिपूरची आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत दोन सुवर्ण आणि एका रौप्य पदकासह तीन पदकांची कमाई केली.

संजिता चानूने पहिलेही सुवर्णपदक पटकावले आहे. 2014 मध्ये ग्लासगोमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत चानूने देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते.

संजिता भारतीय रेल्वेची कर्मचारी आहे. मीराबाई प्रमाणे कुंजाराणी देवी संजिताचा आदर्श आहे.

संजिताला 2017मध्ये अर्जुन पुरस्कारमध्ये सामील करून घेण्यात आलं नव्हतं. त्यामुळे तीने कोर्टात धाव घेतली होती. संजिताला अर्जुन पुरस्कार तर मिळाला नाही. पण तीने काॅमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक जिंकून दाखवले होते.

First published: April 6, 2018, 2:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading