मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : रहाणेचं भविष्य अंधारात, एकच गोष्ट वाचवणार करियर, मांजरेकरांचा सल्ला

IND vs SA : रहाणेचं भविष्य अंधारात, एकच गोष्ट वाचवणार करियर, मांजरेकरांचा सल्ला

भारताचा अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये (India vs South Africa) खास कामगिरी करता आली नाही. या कामगिरीमुळे रहाणेचं टीम इंडियातलं स्थान धोक्यात आलं आहे.

  • Published by:  Shreyas

केपटाऊन, 14 जानेवारी : भारताचा अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये (India vs South Africa) खास कामगिरी करता आली नाही. या कामगिरीमुळे रहाणेचं टीम इंडियातलं स्थान धोक्यात आलं आहे. आता रहाणेची टीम इंडियात पुन्हा निवड होणं कठीण झालं आहे. जोहान्सबर्ग टेस्टमध्ये रहाणेने अर्धशतक केलं, पण केपटाऊन टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये तो 10 रनच करू शकला. पहिल्या इनिंगमध्ये त्याला 9 रन तर दुसऱ्या इनिंगमध्ये 1 रन करता आली. भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी आता अजिंक्य रहाणेला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जाऊन खेळण्याचा सल्ला दिला आहे.

'रहाणेचा खराब फॉर्म भारतीय बॅटिंगवर दबाव वाढवत आहे, त्यामुळे त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन करावं, ज्यामुळे त्याला हरवलेला फॉर्म परत मिळेल. मी रहाणेला आणखी एक इनिंग देणार नाही. पुजारा तरीही मजबूत दिसत आहे,' असं संजय मांजरेकर क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाले.

'मागच्या 3-4 वर्षांमध्ये अजिंक्य रहाणेबाबात मला काहीही आशा वाटत नाही की तो फॉर्ममध्ये येतोय. मेलबर्नमध्ये जेव्हा त्याने शतक केलं तेव्हा झलक दिसली, पण याशिवाय फार काहीच नाही,' अशी प्रतिक्रिया मांजरेकर यांनी दिली.

दुसरीकडे अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. फक्त एक रन करून रहाणे माघारी परतला. मागच्या 50 टेस्टच्या 85 इनिंगमध्ये त्याने 33.23 च्या सरासरीने 2,659 रन केले, यामध्ये 4 शतकं आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे. तर 2021 मध्ये रहाणेने 15 टेस्टमध्ये 20.25 च्या सरासरीने 547 रन केले. डिसेंबर 2020 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नमध्ये रहाणेने शेवटचं शतक केलं होतं. त्याने अखेरची टी-20 आंतरराष्ट्रीय 2016 साली तर शेवटची वनडे 2018 साली खेळली.

First published:

Tags: Ajinkya rahane, South africa, Team india