‘माझ्या कामावर खुश नसाल तर...’, BCCIने केलेल्या हकालपट्टीवर मांजरेकरांनी दिली प्रतिक्रिया

1996मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मांजरेकर समालोचक म्हणून काम करत आहेत.

1996मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मांजरेकर समालोचक म्हणून काम करत आहेत.

  • Share this:
    मुंबई, 15 मार्च : भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांची बीसीसीआयने समालोचक पॅनलमधून हकालपट्टी केली आहे. यानंतर या विषावरून अनेक वाद झाले. मात्र संजय मांजरेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मांजरेकर यांनी बीसीसीआयचा निर्णय मान्य असल्याचे सांगत, आपली नाराजही व्यक्ती केली आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान मांजरेकर उपस्थित नव्हते. यावेळी पैनलवर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar), मुरली कार्तिक (Murli Karthik) आणि एल शिवरामकृष्ण उपस्थित होता. हा सामना पावसामुळे रद्द झाला. मात्र मांजरेकर का नव्हते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानंतर बीसीसीआयच्या सुत्रांनी या पॅनलमधून मांजरेकर यांनी हकालपट्टी केल्याचे सांगितले. वाचा-मांजरेकरांची सुट्टी होताच CSK ने वाजवली 'शिट्टी', जडेजावरच्या कमेंटचा घेतला बदला यावर मांजरेकर यांनी, ‘मी नेहमीच कॉमेंट्रीचा सन्मान केला आहे, परंतु स्वत: ला कधीही मला पात्र मानले नाही. माझी निवड करायची की नाही हे त्यांच्या हातात आहे, मी त्यांना नेहमीच आदर करीन. कदाचित माझे काम बीसीसीआयला आवडले नसावे. मी हा निर्णय स्वीकारतो’, असे ट्वीट केले आहे. वाचा-LIVE सामन्यात खेळाडूंचा अपमान मांजरेकरांना नडला, गांगुलीने केली हकालपट्टी वाचा-ममता बॅनर्जींनी काढला सौरव गांगुलीवर राग, म्हणाल्या... मांजरेकर यांनी आतापर्यंत 3 वर्ल्ड कपचे समालोचन केले आहे. 1996मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मांजरेकर समालोचक म्हणून काम करत आहेत. मात्र बीसीसीआयने त्यांचा आयपीएलच्या पॅनलमध्येही समावेश केलेला नाही आहे. यामागे त्यांनी समालोचन करताना केलेला खेळाडूंचा अपमान हे कारण असू शकते. संजय मांजरेकर यांनी याआधी रविंद्र जडेजा हा चांगला खेळाडू नसल्याचे मत व्यक्त केले होते. यावरून क्रिकेट चाहत्यांनी त्यांना चांगले फैलावर घेतले होते. तसेच, त्यांनी समालोचक आणि क्रिकेट विश्लेषक हर्षा भोगले यांचाही अपमान केला होता. वाचा-ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूने भारतीय तरुणीसोबत दुसऱ्यांदा केला साखरपुडा जडेजाचा केला होता अपमान कोलकाता येथे भारत-बांगलादेश यांच्यात झालेल्या दिवस-रात्र मालिकेदरम्यान मांजरेकर यांनी जडेजावर टीका केली होती. मांजरेकर यांनी,"रवींद्र जडेजा हा एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत नाही. असे कधी तरी खेळणारे खेळाडू मला आवडत नाहीत. त्याचबरोबर, तो कसोटी सामन्यात पूर्ण गोलंदाज आहे. 50 षटकांच्या क्रिकेटसाठी मी प्लेइंग इलेव्हनमध्ये दुसऱ्या कोणत्या तरी फलंदाज किंवा कोणत्याही फिरकी गोलंदाजाचा समावेश करू इच्छितो, पण जडेजाचा नाही", अशा शब्दात टीका केली होती. या वक्तव्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी मांजरेकरांना चांगलेच फैलावर घेतले होते.
    First published: