अश्विनच्या खांद्यावर बंदूक ठेवून मांजरेकरांचा निवड समितीवर निशाणा?

अश्विनच्या खांद्यावर बंदूक ठेवून मांजरेकरांचा निवड समितीवर निशाणा?

रायडूच्या ट्वीटनंतर मांजरेकरांनी '3D'चा वापर करून खिल्ली उडवली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 एप्रिल : आगामी वर्ल्ड कपसाठी भारताच्या क्रिकेट संघाची घोषणा सोमवारी करण्यात आली. यात अंबाती रायडूला वगळण्यात आल्यानंतर त्याने केलेल्या खोचक ट्विटची चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्या चर्चेचं वादळ शांत होण्याआधीच माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांचे ट्विट व्हायरल होत आहे.

रायडूनं निवड समितीवर टीका करताना एक खोचक ट्वीट केलं. त्यात त्याने म्हटलं आहे की, " आता थ्री-डी गॉगल घालून मी विश्वचषक पाहणार आहे." असं ट्विट केलं.यानंतर आता माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनीही ट्विट केलं आहे. यात त्यांनी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्सच्या सामन्याचा आधार घेत निवड समितीवर निशाणा साधला आहे.आयपीएलच्या सामन्यात रविचंद्रन अश्विनने फक्त गोलंदाजीतच नाही तर फलंदाजीतही मोक्याच्या क्षणी जबरदस्त कामगिरी केली. त्याचबरोबर नेतृत्वगुणांच्या जोरावर संघाला विजयही मिळवून दिला. अश्विनच्या कामगिरीचे कौतुक करताना संजय मांजरेकर यांनी वर्ल्ड कपमधील निवड समितीवर टीका केली. त्यांनी म्हटले की, अश्विनने फलंदाजी, गोलंदाजी आणि नेतृत्व अशा तिन्ही प्रकारात चांगली कामगिरी केली. रायडूच्या थ्री डी गॉगलचा त्यांनी थ्री डायमेन्शन असा विशेष उल्लेख ट्वीटमध्ये केला आहे.

World Cup : इंग्लंडच्या संघात KKR चा खेळाडू इन तर राजस्थानचा आऊट

इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी भारताने संघाची घोषणा केली. यातील तीन स्टँडबाय खेळाडूंची नावे निवड समितीने बुधवारी जाहीर केली. संघात समावेश झाला नसला तरी अंबाती रायडू, ऋषभ पंत आणि नवदीप सैनी यांना स्टँडबायमध्ये ठेवलं आहे. जर वर्ल्ड कपच्या दरम्यान एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर या तिघांपैकी कोणालाही इंग्लंडला पाठवले जाऊ शकते.

वाचा - World Cup : भारतीय संघातले 'हे' हिरो शाळेत मात्र झिरो

ऋषभ पंत आणि अंबाती रायडू यांची वर्ल्ड कपमध्ये मधल्या फळीत वर्णी लागेल, अशी अपेक्षा असताना केदार जाधव आणि दिनेश कार्तिकला संघात स्थान देण्यात आले. तर, केएल राहुल याला राखीव सलामीवीर म्हणून तर, विजय शंकर आणि रविंद्र जडेजा यांनाही संघात स्थान देण्यात आले.

...तर पंत, रायडु आणि सैनीला वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी

दरम्यान, पत्रकार परिषदेत निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांना कार्तिकच्या निवडीबाबत विचारले असता, प्रसाद यांनी, “दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्या निवडीबाबत आमची चर्चा झाली. पण दिनेश कार्तिककडं पंतच्या तुलनेत जास्त अनुभव आहे. पण कार्तिकला संघात तेव्हाच स्थान मिळेल जेव्हा धोनी सामना खेळणार नाही. उपांत्यपूर्व फेरी किंवा अंतिम फेरीत भारत खेळत असेल तर, अनुभव जास्त महत्वाचा. त्यामुळंच कार्तिकला प्राधान्य देण्यात आलं’’. असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

...तर बरं झालं असतं, पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2019 07:53 PM IST

ताज्या बातम्या