विराटच्या कर्णधारपदावरून गावस्कर आणि मांजरेकर यांच्यात जुंपली

विराटच्या कर्णधारपदावरून गावस्कर आणि मांजरेकर यांच्यात जुंपली

वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतरही वेस्ट इंडीज दौऱ्यात विराटकडे कर्णधारपद दिल्यानं सुनील गावस्करांनी निवड समितीवर ताशेरे ओढले होते.

  • Share this:

मुंबई, 30 जुलै : भारताचा क्रिकेट संघ वर्ल्ड कपनंतर आता वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. वर्ल्ड कपमधील पराभवानंतर नेतृत्व बदलाची चर्चा केली जात होती. विराट कोहलीच्या ऐवजी रोहित शर्माकडे नेतृत्व द्यावं असंही काही क्रिकेटपटूनी म्हटलं होतं. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केला. याबद्दल निवड समितीलासुद्धा गावस्कर यांनी फैलावर घेतलं होतं. त्यावर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी गावस्कर यांच्या मताशी असहमती व्यक्त करत विराटचं समर्थन केलं आहे.

संजय मांजरेकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, गावस्कर यांच्या मताशी मी सहमत नाही. भारताने वर्ल्ड कपमध्ये केलेली कामगिरी खराब नव्हती. 7 सामने जिंकले आणि फक्त दोन सामन्यात पराभव झाला. शेवटच्या सामन्यात निसटता पराभव झाला. निवडकर्त्यांमध्ये पदापेक्षा गुण महत्त्वाचे असतात असंही मांजरेकर यांनी म्हटलं आहे.

भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडकडून मिळालेल्या पराभवानंतर संघ व्यवस्थापनेवर टीका केली होती. यानंतर गावसकर यांनी निवड समितीला फैलावर घेत संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे का दिले, असा सवाल केला आहे. गावस्कर यांनी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड समितीनं कोणतीही चर्चा न करता कोहलीची कर्णधारपदी फेरनियुक्ती केली असल्याचा आरोप केला आहे.

मिड-डे या इंग्रजी वृत्तपत्रात गावसकर यांनी लिहिलेल्या लेखात, "जर निवड समिती वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कर्णधार निवडताना जर बैठक बोलावली नसले तर ही गोष्ट गंभीर आहे. याचा अर्थ विराट कोहली स्वत:ला हवा म्हणून कर्णधारपदावर कायम आहे किंवा निवड समिती खुश आहे", अशी टीका केली आहे. तसेच गावसकर यांनी, "माझ्या माहितीनुसार कोहलीची नियुक्ती वर्ल्ड कपसाठी करण्यात आली होती. यानंतर निवड समितीनं बैठक बोलवणे गरजेचे होते. ही गोष्ट वेगळी की, बैठका या केवळ पाच मिनिटे चालतात तरी, कर्णधारपदासाठी निवड समितीनं बैठक बोलावणे अपेक्षित होते.'', असेही आपल्या लेखात म्हटलं होतं.

विराट कर्णधार होतोच कसा? गावसकर यांनी निवड समितीला घेतले फैलावर

VIDEO: देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार आमने-सामने, सकाळच्या टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2019 08:39 AM IST

ताज्या बातम्या