BCCI चे नियम त्यांनाच शिकवणारा 'गुप्ता', भारतीय क्रिकेटमध्ये सुरू झालं राजीनामासत्र!

BCCI चे नियम त्यांनाच शिकवणारा 'गुप्ता', भारतीय क्रिकेटमध्ये सुरू झालं राजीनामासत्र!

बीसीसीआयकडे केलेल्या तक्रारीनंतर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि कपिल देव यांनाही त्यांचे पद सोडावं लागलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 ऑक्टोबर : भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी देखील शांता रंगास्वामी यांच्यापाठोपाठ क्रिकेट सल्लागार समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. भारतीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर लोढा समितीच्या शिफारसी लागू करण्यात आल्या. त्यानंतर लाभाच्या पदाचा मुद्दा गेल्या वर्षभरापासून गाजत आहे. यामुळे अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना बीसीसीआय़ने नोटीस पाठवली. यात काही क्रिकेटपटूंना आपलं पदही सोडावं लागलं आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड यांच्यासह क्रिकेट सल्लागार समितीच्या सदस्यांचा समावेश आहे.

मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या आजीवन सदस्य असलेल्या संजीव गुप्तांनीच आतापर्यंत भारताच्या या दिग्गज क्रिकेटपटूंबद्दल बीसीसीआय़कडे तक्रार केली आहे. लहानपणापासून क्रिकेट खेळण्याची आवड असलेल्या गुप्ता यांना विद्यापीठ स्तरापर्यंत क्रिकेट खेळता आले. त्यानंतर मात्र, क्रिकेटला ब्रेक लागला. भारतीय क्रिकेट बोर्डात अमुलाग्र बदल घडवण्यासाठी गुप्ता यांनी बीसीसीआयचे संविधानाचा सखोल अभ्यास केला आहे.

गेल्या तीन वर्षांत संजीव गुप्ता यांनी बीसीसीआयची अनेकदा डोकेदुखी वाढवली आहे. इतक्या तक्रारी केल्यानंतरही ते कधीच माध्यमांसमोर आलेले नाहीत. क्रिकेटपटूंची तक्रार करताना ते बीसीसीआयच्या नियमांचा आधार घेतात. इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार पत्रकारांच्या संपर्कात असूनही त्यांनी मुलाखत देण्यास मात्र नकार दिला. त्यांनी स्वत:चा फोटोही आतापर्यंत प्रसिद्ध करू दिलेला नाही.

गुप्ता यांनी म्हटलं आहे की, त्यांचं कोणाशी वैयक्तिक शत्रूत्व नाही. तसेच तक्रार करण्यामागे कसलाही स्वार्थ नाही. फक्त लोढा समितीच्या नियमांचे उल्लंघने होऊ नये एवढीच इच्छा असल्याचं ते सांगतात. बीसीसीआयदेखील संजीव गुप्ता यांना असलेल्या माहिती आणि नियमांमुळे आश्चर्यचकीत आहे. गुप्ता यांनी नियमांबद्दल विचारले तर ते पानांचे नंबरदेखील सांगतात.

बीसीसीआयचे लोकपाल डीके जैन यांच्याकडे सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांची तक्रार केल्यानंतर संजीव गुप्ता चर्चेत आले होते. गुप्ता यांनी तक्रार केली होती की, एकाच वेळी दोन पदांवर संबंधित क्रिकेटपटू असून यामुळे एक व्यक्ती एक पद या नियमाचे उल्लंघन होत आहे. दरम्यान, तक्रारीवर सुनावणी होण्यापूर्वी सचिन तेंडुलकरने क्रिकेट सल्लागार समितीचा राजीनामा दिला होता.

VIDEO : चंद्रकांत पाटलांचा मार्ग मोकळा; कोथरूडमधील दुसरे बंड ही शांत!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: BCCI
First Published: Oct 3, 2019 01:06 PM IST

ताज्या बातम्या