चर्चा तर होणारच ! सानिया मिर्झानं मुलाचा क्युट फोटो केला शेअर

चर्चा तर होणारच ! सानिया मिर्झानं मुलाचा क्युट फोटो केला शेअर

सानिया 2020ला होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकपासून पुन्हा टेनिसमध्या पुनरागमन करणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 मे : एकीकडं सोशल मीडियावर खेळाडूंची चलती असतेच, पण त्यापेक्षा सध्या चर्चिले जातात ते त्यांची आपत्य. तैमुरनंतर आता सध्या सोशल मीडियावर सानिया मिर्झाचा मुलगा इजहान मिर्झाची हवा आहे. त्याचे फोटो सध्या इन्स्टाग्रामवर चांगलेच व्हायरल होत आहे. यातच सानियानं सोमवार आपल्या मुलासह एक फोटो ट्विटरवर टाकला, त्यानंतर फॅन्समध्ये त्याचीच चर्चा आहे.

30 ऑक्टोबर 2018ला इजहानचा जन्म धाला. तेव्हापासूनच सानिया आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू सोहेब मलिक आपल्या मुलाचे क्युट फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असतात. मात्र, विख्यात फोटोग्राफर अविनाश गोवारीकर यांनी काढलेल्या इजहानच्या या फोटोवरुन तुमची नजरच हटणार नाही.

वाचा- IPL 2019 : IIT मद्रासला कूल धोनीची चिंता, परीक्षेत विचारला 'हा' प्रश्न

दरम्यान सानिया सध्या 2020 साली होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकपासून पुन्हा टेनिसमध्या पुनरागमन करणार आहे. सानिया सध्या आपल्या मुलासोबत वेळ घालवत असली तरी, ती सराव करताना दिसते. सानिया आपल्या प्रेग्नेंसीनंतर खेळ सोडणार नसल्याचं याआधीच तिनं स्पष्ट केलं होतं. तिनं याबाबत एका मुलाखतीत, मला एक उदाहरण प्रस्थापित करायचं आहे की, ''मुलं झाल्यानंतरही महिला सगळं करु शकतात. तुम्हची स्वप्न ही तुमची असतात, त्यात कोणतेही अडथळे येऊ शकत नाहीत’’.

वाचा- VIDEO : धोनीबद्दल ‘कॉमेंटेटर’ असं काय बोलला की, साक्षीला हसू आवरता आलं नाही

मातृत्वानंतरही मैदानात उतरणारी सानिया पहिली खेळाडू नाही आहे. तर, सेरेना विलियम्स आणि किम क्लिस्टर्स या टेनिस खेळाडूंनीही टेनिस कोर्टवर कमबॅक केला होता. सेरेनानं तर, ती प्रगन्ट असताना 2017ला ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली. दरम्यान आपल्या मुलीला जन्म दिल्यानंतर सेरेना मार्च 2018मध्ये लगेचच WTA टुरसाठी रवाना झाली. आता सानियाही 2020मध्ये पुनरागमन करणार आहे.

वाचा-'या' खेळाडूचं दुखापतींशी जुनं नातं, तरी वर्ल्ड कप संघात मिळाली संधी

SPECIAL REPORT: बंगालमध्ये तृणमूल आणि भाजपमधील संघर्ष शिगेला

First published: May 7, 2019, 9:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading