भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा लवकरच आता आई होणार आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात सानिया आपल्या बाळाला जन्म देणार आहे.

  • Share this:

24 एप्रिल : भारताची स्टार टेनिसपटू  सानिया मिर्झा लवकरच आता आई होणार आहे.  येत्या ऑक्टोबर महिन्यात सानिया आपल्या बाळाला जन्म देणार आहे. ट्विटर अकाऊंटवरून तिनं ही खूशखबर दिलीय. ही गोड बातमी देताना तिनं एक फोटो शेअर केलाय, ज्यात सानिया आणि शोएबचे कपडे आणि वस्तू असलेल्या वॉर्डरोबमध्ये त्यांचं नावं आणि मधल्याकपाटात मिर्झा मलिक लिहिलं आहे, त्यात बाळाचे कपडे असल्याचं दाखवण्यात आलंय.

सानिया आणि तिचा क्रिकेटपटू नवरा शोएब मलिक यांनी या १२ एप्रिलला आपल्या लग्नाची ८ वर्ष पूर्ण केली आहेत. तसंच  गुडघेदुखीमुळे सानिया मिर्झा गेल्या ऑक्टोबरपासून खेळापासून लांब आहे.

First published: April 24, 2018, 11:20 AM IST

ताज्या बातम्या