खेळाडूंसोबत पत्नी, मैत्रिणी दौऱ्यावर जाणं फायद्याचं, सानिया मिर्झाने सांगितलं कारण

क्रिकेटपटूंसोबत त्यांची पत्नी किंवा मैत्रिण असेल तर त्यांचे खेळावरून लक्ष विचलित होते म्हणून अनेकदा यासाठी परवानगी दिली जात नाही. मात्र, सानियानं ही मानसिकता चुकीची असल्याचं म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 4, 2019 09:56 AM IST

खेळाडूंसोबत पत्नी, मैत्रिणी दौऱ्यावर जाणं फायद्याचं, सानिया मिर्झाने सांगितलं कारण

नवी दिल्ली, 04 ऑक्टोबर : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने क्रिकेटपटूंना त्यांची पत्नी आणि मैत्रिणींसोबत दौऱ्यावर जाण्यास परवानगी नाकारण्यावर टीका केली आहे. तिने गुरुवारी एका कार्यक्रमावेळी सांगितलं की, अशा प्रकारचे निर्णय म्हणजे महिला ताकद नाही तर लक्ष विचलित करणाऱ्या मानण्याच्या मानसिकतेचं उदाहरण आहे.

सानिया मिर्झा म्हणाली की, मुलींना लहानपणापासून खेळामध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन द्यायला हवं. अनेकदा आपल्या क्रिकेट संघामध्ये पत्नी किंवा मैत्रिणींना सोबत नेण्यास मज्जाव केला जातो. कारण काय तर मुलींमुळे खेळावरून लक्ष विचलित होईल.

मुलींमुळे किंवा पत्नीमुळे खेळाडू खेळावर लक्ष केंद्रीत करू शकणार नाहीत याचा अर्थ काय? महिला असं काय करतात ज्यामुळे पुरुषांचे लक्ष विचलित होते असे प्रश्न विचारताना सानियाने ही चुकीची मानसिकता असल्याचं सांगितलं.

क्रिकेटपटूंसोबत ज्यावेळी त्यांची पत्नी किंवा मैत्रिण असते त्यावेळी त्यांची कामगिरी जास्त चांगली होते. काऱण ते जेव्हा खोलीत येतात तेव्हा आनंदी असतात. क्रिकेटपटू रिकाम्या खोलीत परत येत नाहीत. ते बाहेर फिरणं, खाणं अशा गोष्टी करतात. त्याउलट पत्नी, मैत्रिण किंवा साथीदार असतात तेव्हा खोलीमध्ये येतात.

भारताचा कर्णधार विराट कोहली जेव्हा शून्यावर किंवा कमी धावांवर बाद होतो तेव्हा अनुष्काला टार्गेट केलं जातं. याचा काही एक संबंध नसतो असंही सानिया मिर्झाने सांगितलं. वर्ल्ड कपवेळी पाकिस्तानच्या पराभवानंतर सानिया मिर्झाला ट्रोल करण्यात आलं होतं.

Loading...

VIDEO: प्राण्याचा मुखवटा लावून चोराचा सराफाच्या दुकानावर डल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2019 09:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...