बाळंतपणानंतर सानिया मिर्झा पुन्हा टेनिस खेळायला सज्ज, शेअर केला VIDEO

बाळंतपणानंतर सानिया मिर्झा पुन्हा टेनिस खेळायला सज्ज, शेअर केला VIDEO

टेनिसपटू सानिया मिर्झानं नुकताच एक व्हिडिओ ट्विट केला. त्यात ती टेनिस खेळताना दिसतेय.

  • Share this:

मुंबई, 11 मार्च  : टेनिसपटू सानिया मिर्झानं नुकताच एक व्हिडिओ ट्विट केला. त्यात ती टेनिस खेळताना दिसतेय. तिनं ट्विट करत लिहिलंय, सो..थिस हॅपन्ड टुडे. या ट्विटवरूनच ती खूप खूश दिसतेय.

सानिया मिर्झा आणि शोएब अख्तर यांना 29 आॅक्टोबरला मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं ईझान. टेनिस स्टार सानियाने गरोदर असल्याची बातमी एप्रिल महिन्यामध्ये शेअर केली होती.त्यावेळीच तिनं टेनिसपासून ब्रेक घेतला होता.

फिल्म फेअरला दिलेल्या इंटरव्यूमध्ये तिनं म्हटलं होतं, ' मी टेनिसला मिस केलं हेही खरं असलं तरी आयुष्यात प्रत्येक गोष्टींचा अनुभव घ्यायला हवा. मला दुखापत झाली तेव्हा मी ब्रेक घेतला होता. नंतर आम्ही बाळाला जन्म द्यायचा निर्णय घेतला. मी टेनिस मिस करायचे म्हणून गरोदर असतानाही मी टेनिस खेळलेय.'

सानिया सात महिन्याची गरोदर असताना आपल्या बहिणीसोबत एक फ्रेंडली टेनिस मॅच खेळली होती.

सानियाचा नवरा शोएब मलिकने 29 ऑक्टोबरला ट्विटरद्वारे बाप झाल्याची माहिती देत, हैदराबादच्या एका खासगी रुग्णालयात सानियानं बाळाला जन्म दिला असल्याचं सांगितलं होतं. गरोदर असल्याची बातमी सानियाने शेअर केल्यावर तिने सांगितलं होतं की, मुलगा आपल्या नावासोबतच मिर्झा आणि मलिक अशी दोन्ही आडनावं जोडणार आहे.

शोएब मलिकचा मॅनेजर अहिम हक यानं ही बातमी सर्वप्रथम शेअर करत सांगितलं की, ‘बेबी मिर्झा मलिकचं’ आगमन झाले आहे. आणि आई सानिया फार खूश आहे. वडील शोएब सध्या खूप आनंदात आहेत. अनेकांच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू असताना सगळ्यात आधी सानियाची जवळची मैत्रीण फरहान खानने इन्स्टाग्रामवर 'मी मावशी झाले' अशी बातमी देत आनंद व्यक्त केला होता.

VIDEO : 'इंजिना'ला टाटा करून मनसेचे एकमेव आमदार शिवसेनेत दाखल

First published: March 11, 2019, 6:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading