सानिया मिर्झानं पती शोएब आणि मुलासोबत साजरी केली 'ईद' PHOTO पाहून साक्षी धोनीनं दिली ही कमेंट

सानिया मिर्झानं पती शोएब आणि मुलासोबत साजरी केली 'ईद'  PHOTO पाहून साक्षी धोनीनं दिली ही कमेंट

काल नुकतीच ईद(Eid )झाली आणि सानियाने (Sania Mirza)यावेळी ईद दुबईत साजरी केली.

  • Share this:

मुंबई, 15 मे-  भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) खेळासोबत सोशल मीडियावर देखील चांगलीच अक्टीव्ह असते. सध्या कोरोनामुळे सानियाची कोणतीच मॅच झालेली नाही. तर,शोएब (Shoaib Malik) देखील पाकिस्तानी टीममधून बाहेर आहे. सानिया मुलगा इजहान आणि पती शोएब मलिक तसेच कुटुंबीयांसमवेत काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर(social media)करत असते. काल नुकतीच ईद(Eid )झाली आणि सानियाने यावेळी ईद दुबईत साजरी केली.  सानियाने ईदच्या सेलिब्रेशनचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम आणि फेसबूक अकाऊंटवर शेअर केले आहेत. याबाबत जनसत्ताने बातमी दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

सानियाने फोटोला कॅप्शन दिलंय,‘आमच्याकडून तुम्हाला ईदच्या खूप साऱ्या शुभेच्छा.’या फोटोजमध्ये सानिया मुलगा इजहानसोबत हिरव्या रंगाच्या कपड्यांमध्ये ट्विनिंग करताना दिसत आहे. तर शोएब डल क्रिम कलरच्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. सानियाचे हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल,वाह क्या बात है.

View this post on Instagram

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

सानियाने तिचे फोटो शेअर केल्यानंतर क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी,बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा,क्रिकेटर रॉबिन उथप्पाची पत्नी शितल गौतम,सिंगर अनन्या बिरला,अभिनेत्री समिता बंगार्गी चौधरीसह अनेकांनी कॉमेंट्स केल्या आहेत. तर,सानियाच्या या फोटोला आतापर्यंत अडीच लाखांपेक्षा अधिक लोकांनी लाईक केलंय. आणि मुलगा इजहानसोबतच्या फोटोला 3 लाख 31 हजार लोकांनी लाईक केलंय.

(हे वाचा:सई ताम्हणकर ते पल्लवी पाटील या मराठी अभिनेत्री झाल्या पतीपासून विभक्त  )

सानियानं तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत सहा ग्रँडस्लॅम(grand slam)खिताब जिंकले आहेत. कॉमनवेल्थ गेम्स(common wealth games),एशियन गेम्स(Asian Games), एफ्रो-एशियन गेम्समध्ये तीने 14 मेडल जिंकले आहेत. त्यापैकी सात गोल्ड मेडल(Gold Medal)आहेत. सानिया आणि शोएब दोघंही 2004 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात एकमेकांना भेटले होते. त्यावेळी होबार्टच्या एका हॉटेलमध्ये दोन मिनीटांसाठी त्यांची भेट झाली होती आणि ते एकमेकांना केवळ नावानी ओळखत होते. त्यानंतर दुसरी भेट जेव्हा शोएब वकार युनूसोबत सानियाची मॅच बघायला आले तेव्हा झाली होती. त्यांची तिसरी भेट सानियाचा सोहराबसोबतचा साखरपुडा मोडल्यानंतर झाली होती. त्यानंतर एकमेकांना एक वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी 2010 मध्ये लग्न केलं. दोघांनाही एक मुलगा असून त्याचं नाव इजहान आहे.

First published: May 15, 2021, 8:27 PM IST

ताज्या बातम्या